पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
Satara News Team
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्याला लागलेली गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांची मरगळ झटकण्यासाठीचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासमोर आव्हान होते. सातारा जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेताना अवैध मटका, जुगार, दारू विक्री यांसारख्या प्रमुख बाबी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. गेल्या २ वर्षांच्या काळात जिल्ह्यात बाल गुन्हेगारीबरोबरच अवैध मटका, जुगार, दारू विक्री आणि वेश्या व्यवसायाने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले होते. त्यामुळे या व्यवसायांवर कारवाई झाल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास जाणकारांनी पोलीस अधीक्षकांसोबत व्यक्त केला होता. त्यानुसार काल पोलीस अधीक्षकांनी अवैध मटका, जुगार, दारू विक्री व्यवसायांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार सातारा शहरासह तालुका परिसरात पोलिसांनी चक्री व जुगार अड्डड्यांवर छापे टाकून संशयितांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये संगणक, दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप, जुगाराचे साहित्य असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि १२ जणांवर कारवाई केली.
पहिली कारवाई बोगदा ते कुरणेश्वर रस्त्यावरील शेडमध्ये छापा टाकला. याप्रकरणी अभिजित चौगुले (वय ३३, रा. मंगळवार पेठ, सातारा) व गणेश कुऱ्हाडे (४३, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या कारवाईत संगणक, दुचाकी व मोबाईल असा ७८ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई नागेवाडी येथे नीळकंठ सावंत (४८, रा. नागेवाडी) याच्यावर केली. त्याच्याकडून ७६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. तिसरी कारवाई राजवाडा परिसरातील जनावरांच्या दवाखाना परिसरात केली. अनिल वाघमारे (४५, रा. गुरुवार पेठ) याच्याकडून शाहूपुरी पोलिसांनी ९०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. चौथी कारवाई परळी येथे केली. तालुका पोलिसांनी प्रतीक जाधव (२५, रा. अंबवडे बु.) व सोमनाथ मनवे (२९, रा. मानेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, दोन दुचाकी असा १ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पाचवी कारवाई गुरुवार परज, येथे मनोज माने (५३, रा. बुधवार पेठ) याच्यावर शहर पोलिसांनी केली. त्याच्याकडून १,१५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. सहावी कारवाई सातारा बसस्थानक परिसरात केली. याप्रकरणी संतोष जनार्दन शेळके (५०, रा. शेळकेवाडी), सुनील नारायण अवघडे (३३, रा. सैदापूर), सोमनाथ चोरगे (रा. रविवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून ६,२१४ रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. सातवी कारवाई सदर बाजार येथे केली. याप्रकरणी अश्पाक गुलाब शेख (३६), तोसिफ मज्जिद शेख (दोघे रा. सदर बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून १,०५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेश मानून पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली खरी परंतु, मागे झालेल्या कारवाईचा अनुभव पाहता या कारवाईमध्ये सातत्य राहणं गरजेचं आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Sat 25th Apr 2026 04:12 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Sat 25th Apr 2026 04:12 pm











