मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू

मसूर : आरफळ कालव्याचे पाणी पिके करपून गेल्यावर सोडण्यात आले. पाटबंधारे प्रशासनाच्या नियोजनशून्य... मनमानी कारभारामुळे कराड उत्तर मधील मसूर पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर कालव्याला पाणी आले, राजकीय श्रेयवाद उफाळला. मसूर मधल्या मुख्य जुन्या बसस्थानक चौकात जल्लोषही झाला. मात्र प्रत्यक्षात शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अद्याप पाणी पोहोचलेले नाही. परिणामी पिके करपली. शेतकऱ्यांसमोर आता “पाणी दिसतंय... पण मिळत नाही” अशी अत्यंत वेदनादायी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ, बेजबाबदार, नियोजनशून्य कारभारावर. शेतकऱ्यांनी वाभाडे काढले आहेत. शेतकऱ्यांच्या मते एवढ्या गंभीर परिस्थितीत एकही ठोस नियोजन बैठक घेण्यात आली नाही. कोणत्या गावाला किती पाणी द्यायचे, कोणत्या पोटपटाला किती वेळ पाणी सोडायचे, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी काय उपाययोजना करायच्या. याचे कोणतेही  नियोजन प्रशासनाकडे नव्हते. परिणामी कालव्यात पाणी आल्यानंतर त्याचे योग्य व्यवस्थापन कोलमडले. अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकऱ्यांच्या घामावर पाणी फिरवले.नेमकं कोणाचं अपयश? नियोजनशून्य प्रशासनाचं… की शेतकऱ्यांच्या वेदनांबद्दल असलेल्या असंवेदनशील व्यवस्थेचं?

   त्यातच ट्रक कालव्यात  पडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. अन्  एक संपूर्ण रोटेशन वाया गेले. या कालावधीत प्रचंड उन्हामुळे उसासह अनेक पिकांनी अक्षरशः मान टाकली. विहिरी कोरड्या पडल्या. अनेक शेतकऱ्यांनी मोटारी बंद ठेवल्या. पाण्याअभावी हजारो एकर क्षेत्रावरील पिके करपली.  लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

आता पाणी आले.  तरी स्थिती आणखी बिकट बनली. दीर्घ प्रतीक्षेनंतर पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये पाणी पाजण्यासाठी चढाओढ लागली.  “आधी माझ्या शेताला पाणी द्या” यासाठी अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले.. काही भागात पाटाला पाणी दिसत असले तरी पोटपटापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने शेवटच्या टोकावरील शेतकरी हतबल झाले आहेत.अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात “शिवजा” काढून नेल्याने पाण्याचा प्रवाह विस्कळीत झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. परिणामी अनेक पोटपाट कोरडेच पडले आहेत. शेतकऱ्यांना “हक्काचे पाणी डोळ्यासमोरून वाहताना दिसते, पण शेतीपर्यंत येत नसल्याची स्थिती आहे. विशेषतः प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी यंत्रणा राबवली  नाही. पाणी वाटपावर नियंत्रण नाही.  शेतकरीच स्वतःच्या जीवावर पाणी अडवणे, वळवणे, पिके वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.


वर्षभराची पाणीपट्टी घेता.. तरीही हक्काचे पाणी का नाही ॽ...
 शेतकऱ्यांची पिके करपली, लाखोंचे नुकसान झाले. वेळेवर नियोजन झाले असते.... नियमित बैठक घेतल्या असत्या.... अनधिकृत पाणीउचल रोखली असती.....  रोटेशन शिस्तीत चालवले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी तीव्र भावना शेतकऱ्यांच्यामध्ये आहे. वर्षभराची पाणीपट्टी घेता.मग  हक्काचे पाणी  शेतकऱ्यांना का मिळत नाही ॽ ही अत्यंत वेदनादायक बाब आहे.  तातडीने चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. पाण्याच्या श्रेयवादासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याबाबत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशी स्पष्टोक्ती शेतकऱ्यांनी केली आहे.
आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

मशिनरी स्क्रॅपिंग जगतात ‘रोशन इंटरप्रायझेस’चा डंका; वर्धनगडचे सुपुत्र शकील शिकलगार यांचे औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य

मशिनरी स्क्रॅपिंग जगतात ‘रोशन इंटरप्रायझेस’चा डंका; वर्धनगडचे सुपुत्र शकील शिकलगार यांचे औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य

विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम

विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम

माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप

माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप

रयतराजच्या दणक्याने  चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....

रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....

पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे

पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे

नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.

नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला