वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
Satara News Team
- Wed 6th May 2026 04:43 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण तालुक्यात असणाऱ्या बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापूर्वी एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका नराधमाने अत्याचार करून या अत्याचारातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर त्या आरोपीला संतप्त नातेवाईकांनी मारहाण करून वडगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता. पोलिसांनी या आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीने पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चालू ठेवला होता.
फलटण येथे श्री सेवा मॅटर्निटी होम या नावाने डॉक्टर योगेश नरुटे हे वैद्यकीय व्यवसाय करत होते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलीला आणून बेकायदेशीरपणे संशयीत डॉक्टर योगेश नरुटे यांनी या मुलीचा गर्भपात केला होता . या मुलीला पिंटू धुमाळ याने संशयित डॉक्टर योगेश नरु टे याच्या रुग्णालयात आणून कायद्याचे उल्लंघन करून गर्भपात केला होता. असे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर वडगाव पोलिसांनी प्रत्यक्ष फलटण येथे दवाखान्यात येऊन डॉक्टर योगेश नरुटे याला अटक केली आहे.
फलटण तालुका या अगोदरही अवैध लिंग निश्चिती आणि गर्भपात यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत राहिला आहे.
खरंतर असे अवैध गर्भपात लिंग निश्चिती म्हणजे कायद्याने बंधनकारक असून सुद्धा राजरोसपणे फलटण येथे घडत असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या अगोदरही असे अवैध गर्भपात आणि लिंगनिश्चिती फलटण येथे घडत असल्याचे या नवीन घटनेमुळे फलटण येथील नागरिकांच्यात दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.
यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक आरोप डॉक्टर योगेश नरोटे यांच्यावर झाल्याचे नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे. यामुळे फलटणमध्ये गर्भपात करणारे मोठे रॅकेटच अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी सद्यस्थिती दिसून येत आहे. डॉक्टर नरुटे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी किंवा काही अन्य कारणामुळे या मुलीचा गर्भपात केला आहे याची कसून चौकशी होऊन अशा अवैध गर्भपातांना कायद्याने बंदी असताना सुद्धा तात्काळ आळा बसावा अशी मागणी फलटण येथे जोर धरू लागली आहे. आणि हे गर्भपाताचे रॅकेट पूर्णपणे बंद करण्यात यावे अशा विविध सामाजिक संघटना तसेच नागरिक यांच्याकडून मागणी होत आहे. फलटण येथे वैद्यकीय सेवा देणारे अतिशय निष्णात आणि नामांकित डॉक्टर येथे कार्यरत असताना फलटण शहराला काळी फासणारी ही घटना उघड झाल्यामुळे फलटण येथील नागरिकांच्या अस्वस्थता दिसून येत आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी डॉक्टर नरुटे यांच्या रुग्णालयाची तपासणी करून संशयित डॉक्टर नरुटे यास या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 6th May 2026 04:43 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Wed 6th May 2026 04:43 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 6th May 2026 04:43 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 6th May 2026 04:43 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 6th May 2026 04:43 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 6th May 2026 04:43 pm
संबंधित बातम्या
-
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 6th May 2026 04:43 pm
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Wed 6th May 2026 04:43 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 6th May 2026 04:43 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 6th May 2026 04:43 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 6th May 2026 04:43 pm











