सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
राजा-संग्राम’ बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाचे मानकरी
कुलदीप मोहिते - Wed 20th May 2026 12:39 pm
- बातमी शेयर करा
कराड : सत्यजित केसरी पर्व 4 थे” या भव्य बैलगाडा शर्यत मैदानात 'पश्चिम महाराष्ट्र केसरी राजा' व 'संग्राम' हे बैल जोडी प्रथम क्रमांक पटकावून सुपरहिट ठरली आहे. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सत्यजित केसरी पर्व ४ थे बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन कराड वारुंजी येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत मध्यप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील नामांकित बैलगाडा मालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही बैलगाडा शर्यत संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये सौ. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा पश्चिम महाराष्ट्र केसरी राजा व जगदाळे यांचा संग्राम ही जोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. किरण आप्पा कालगाव यांचा रैना व भीमगावकरांचा सावकार ही जोडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. पै. आनंदराव आप्पा रेठरेकर यांचा राजा व म्हारुगडे वाडीकरांचा मन्याभाई ही जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
तसेच सुजगावकरांचा बकासुर व दुर्गा, कालेढोणकरांचा चिंक्या-दहिगावकरांचा पाखऱ्या या जोड्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. गिरवीकरांचा माऊली व लोबोदकरांचा कृष्णा ही जोडी पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरली. कोरेगावकरांचा भवाबी व पवार यांचा अवतार ही जोडी सहाव्या क्रमांकावर राहिली. तर पंढरीनाथ फडके यांचा रोमन व साखरवाडीकरांचा बावऱ्या ही जोडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली.
विशेष म्हणजे तब्बल 6 लाख 40 हजाराहून अधिक प्रेक्षकांनी या शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण पाहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
या बैलगाडा शर्यत मैदानाला कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा, बाळासाहेब पाटील आबा, अजितआप्पा पाटील चिखलीकर, गजानन आवळकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, सुनील पाटील, प्रा. धनाजी काटकर, प्रदीप जाधव, रवींद्र बडेकर, संभाजी चव्हाण, महादेव पाटील, नथुराम झिमरे, संदीप काकडे, सुरेश भोसले (आप्पा), हणमंत भोपते, विजय माने, शिवाजीराव जमाले, भिमराव जमाले, मुजीम ईनामदार, सुभाष चव्हाण, विश्वास निकम, राहुल पवार, अभिजीत पवार, राहुल काळोखे तसेच बैलगाडा शौकीन, नामदेव पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते, बैलगाडा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 20th May 2026 12:39 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 20th May 2026 12:39 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 20th May 2026 12:39 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 20th May 2026 12:39 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Wed 20th May 2026 12:39 pm
संबंधित बातम्या
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 20th May 2026 12:39 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 20th May 2026 12:39 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 20th May 2026 12:39 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 20th May 2026 12:39 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 20th May 2026 12:39 pm
-
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Wed 20th May 2026 12:39 pm










