50 हजार रुपयांत सभासदत्व न दिल्याने ऍड. शिरगावकर-पाटीलांचे नैराश्यातून आरोप

सातारा : हणमंत किसन फरांदे हे त्यांच्या वैयक्तिक आकसापोटी आपल्या सातारा क्लब फोरमची नाहक बदनामी करीत आहेत. याबाबत क्लब व्यवस्थापन त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई करणार असून फरांदे हे सभासदांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी नाहक गैरसमज पसरवीत आहेत. दरम्यान माजी जिल्हा सरकारी वकील विकास शिरगावकर पाटील यांना केवळ 50 हजार रुपयांमध्ये सभासदत्व हवे होते. मात्र क्लब मध्ये तशी तरतूद नसल्याने त्यांनी आज त्याच नैराश्यातून सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली खदखद व्यक्त केली असल्याचा खुलासा सातारा क्लब फोरम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.


पत्रकात म्हटले आहे की, हणमंत किसन फरांदे यांना फेब्रुवारी 2003 मध्ये तत्कालीन ऑ. सेक्रेटरी यांनी क्लब मध्ये इन्व्हर्टर बसविणे व क्लब चा इलेक्ट्रिक मेंटेनन्स पाहणे या बदल्यात सभासदत्व मंजूर केले होते. फरांदे यांनी केलेल्या कामाच्या दर्जाबाबत तत्कालीन व्यवस्थापनाकडे अनेक तक्रारी आल्याने तसेच सेवा वेळेत मिळत नसल्याने दि. 25 मार्च 2019 मध्ये तत्कालीन व्यवस्थापक सचिव यांनी सादर केलेल्या व तत्कालीन माजी अध्यक्ष यांनी मंजूर केलेल्या टिपणीनुसार फरांदे यांचे लाईट कामाच्या दुरुस्तीसाठी दिलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले, या आकसापोटी व त्याचा राग मनात धरून फरांदे यांनी क्लब व्यवस्थापनास नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. क्लब नूतनीकरण कामात अडथळे निर्माण करणे, विद्युत साहित्य खरेदी बाबत आक्षेप घेणे, विद्युत ठेकेदारांना धमकावणे, व्यवस्थापन समिती सदस्य यांच्याशी हुज्जत घातणे, सभासदांची गैरवर्तणूक करून त्यांना असभ्य भाषा वापरणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारचे वर्तन त्यांनी केले. फरांदे यांच्या क्लब मधील गैरवर्तनाचा विचार करून 2019 मध्ये तत्कालीन अध्यक्ष श्वेता सिंघल यांनी दि. 25 मार्च 2019 च्या आदेशानुसार फरांदे यांचे सभासदत्व रद्द केले आहे. त्यानंतर कोरोना काळामध्ये क्लब बंद असल्यामुळे याबाबतीत पुढील कारवाई प्रलंबित राहिली. ही बाब कार्यकारणी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर फरांदे यांनी वार्षिक मेंटेनन्स फी पुढील आदेश होईपर्यंत घेऊ नये, असा निर्णय घेतला. फरांदे यांना क्लब व्यवस्थापकामार्फत याबाबत अवगत करून सुद्धा त्यांनी त्यांची आर्थिक वर्ष 2024-25 ची वार्षिक मेंटेनन्स फी ऑनलाईन अदा केली आहे. त्यामुळे त्याची पावती देण्यात आलेली नाही. त्यांनी भरणा केलेली रक्कम धनादेशाद्वारे परतावा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सातारा क्लब ही संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत नाही, असे फरांदे म्हणत आहेत. प्रत्यक्षात दि. 1885 मध्ये सातारा क्लब ची स्थापना ब्रिटिश सरकारने केलेली आहे. हा क्लब गेली 129 वर्ष अस्तित्वात आहे. परंतु त्याची कुठेही नोंदणी झाली नसल्याने सातारा क्लब फोरम या नावाने प्रथमच दि. 6 जानेवारी 2023 रोजी कंपनी कायदा 2013 मधील कलम (8) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. क्लबला तसे प्रमाणपत्र मिळालेले आहे. सातारा क्लब मध्ये जमा झालेल्या सभासद शुल्कातून करण्यात येणारा प्रत्येक कामाच्या खरेदीच्या निविदा मागवून त्यावर नियुक्त तांत्रिक कमिटीमार्फत शहानिशा होऊन कार्यकारणी समिती सदस्य सभेमध्ये त्यास मंजुरी घेण्यात येते. त्या अनुषंगाने पुढे होणारा प्रत्येक खर्च हा तांत्रिक कमिटीमार्फत मंजूर करून त्याला सचिव मान्यता देतात. अध्यक्षांच्या अंतिम मंजुरीनंतरच देयके अदा केली जातात. दरम्यान माजी जिल्हा सरकारी वकील विकास शिरगावकर-पाटील यांना केवळ 50 हजार रुपयात सभासदत्व हवे होते. मात्र सातारा क्लब मध्ये तशी तरतूद नसल्याने त्यांना क्लबचे सभासदत्व देता येत नव्हते. याच नैराश्यातून त्यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली खदखद व्यक्त केल्याचा खुलासा सातारा क्लब फोरम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त