नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
वीर धरणातून नीरा नदी मध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात.राजेंद्र बोन्द्रे
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
- बातमी शेयर करा
फलटण. संपूर्ण महाराष्ट्रात जोराचा मुसळधार पाऊस सुरू असून निरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून नीरा नदीवर असणाऱ्या वीरधरणाचा पाणी पातळीमध्ये झपाट्याने लक्षणीय वाढ होत आहे. कार्यकारी अभियंता रा.पो. मोरे नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8/7/ 2026 रोजी दुपारी दोन वाजता वीर धरणाची पाणी पातळी578.75 इतकी असून उपयुक्त पाणीसाठा 8.21 टीएमसी झाला आहे. सद्यस्थितीला वीर धरण 87.27 टक्के लक्षणीय भरले असून जोराचा मुसळधार पाऊस चालू असल्याने वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणातून नीरा नदीमध्ये अल्पावधीतच पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात येईल ,त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये तसेच कोणत्याही प्रकारची जीवीत वित्तहानी होणार नाही याबाबतची दक्षता दक्षता घेण्यात यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग फलटण कार्यकारी अभियंता श्री रापा मोरे यांनी केले आहे.
नीरा नदीच्या काठावरच्या नागरिकांनी वेळीच खबरदारी घेऊन सतर्क राहावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 8th Jul 2026 06:33 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 8th Jul 2026 06:33 pm











