फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
राजेंद्र बोन्द्रे
- Sun 19th Jul 2026 10:19 am
- बातमी शेयर करा
फलटण.: फलटण शहरात सर्व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे आणि महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि सदैव पवार साहेबांच्या बद्दल आदर व्यक्त करणारे माननीय नंदकुमार जी मोरे यांचे आज सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.
आणि फलटण शहरात सर्वत्र शोक कळा पसरली. 17 जुलै रोजी आलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्वत्र असणाऱ्या विविध मंडळाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन युवकांना प्रबोधन पण केले होते. सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अंत्यविधी आज दुपारनंतर वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे होणार आहे.
माननीय नंदकुमार जी मोरे हे नेहमीच सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात आणि समाजाची जडणघडण सामाजिक सलोखा राजकीय सलोखा एकत्र राखण्याचा नेहमीच प्रयत्न करत होते. प्रत्येक विषयातील त्यांची सातत्यता आणि सखोल अभ्यास, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, पाहता फलटण शहरांमध्ये शोक कळा पसरली आहे. शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असणारा त्यांचा मित्रपरिवार प्रचंड संख्येने फलटण शहरात एकत्र येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.
सातारा न्यूज च्या टीमशी सदैव आत्मीयतेने आणि संलग्न असणारे व्यक्तिमत्व या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला सातारा न्यूज टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
स्थानिक बातम्या
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sun 19th Jul 2026 10:19 am
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sun 19th Jul 2026 10:19 am
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sun 19th Jul 2026 10:19 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sun 19th Jul 2026 10:19 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sun 19th Jul 2026 10:19 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 19th Jul 2026 10:19 am
संबंधित बातम्या
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sun 19th Jul 2026 10:19 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 19th Jul 2026 10:19 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sun 19th Jul 2026 10:19 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 19th Jul 2026 10:19 am












