विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.

"ठेकेदाराकडे जा" असा सल्ला; मात्र ठेकेदार कोण हेच कामगारांना माहीत नसल्याने संताप..

विशाळगड येथे १३ जुलै २०२६ पहिल्यांदाच विशालगड व गजापूर हिंदू मुस्लिम बांधवांनी विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज आगमन दिन उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तो शिवागमन दिन संपूर्ण भारतातून महोत्सव म्हणून साजरा केला जाईल आणि आज हा दिवस साजरा करायची विशाळगड मुस्लिम समाजाची संकल्पना संपूर्ण देशभरातून साजरी केली जाईल असा विश्वास शाहूवाडी पंचायत समितीचे उपसभापती अमरसिंह खोत यांनी विशाळगड येथील वीरांचे बलिदान - शौर्य दीन व छत्रपती शिवाजी महाराज आगमन दीन उत्सव साजरा करत असताना व्यक्त केला.

१३ जुलै  रोजी दरवर्षी पावनखिंड येथे वीर बलिदान दीन म्हणून साजरा केला जातो.१३ जुलै २०२६ रोजी पहिल्यांदाच विशालगड - गजापूर मुस्लिम समाजाच्या संकल्पनेतून अनोखा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करत शाहूवाडी तालुक्यातील प्रमुख मंडळी आणि सातारा येथील मुस्लिम मावळ्यांच्या उपस्थितीत वीरांचे बलिदान - शौर्य दीन व पन्हाळ्याचा वेढा तोडून छत्रपती शिवाजी महाराजांचे विशालगडावरील आगमन छत्रपती शिवाजी महाराज आगमन शिवागमन दीन म्हणून साजरा करण्यात आला.


          आज शौर्य दीन व छत्रपती शिवाजी महाराज आगमन दीन उत्सव साजरा करताना सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या अस्सल पंजाची प्रतिकृतीचे मिरवणुकीने स्वागत करून वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे यांना त्यांच्या विशालगडावरील समाधी स्थळी जाऊन अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर विशालगडावरील कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाची प्रतिकृतीचे फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रम स्थळी सर्जेराव पाटील पेरीडकर श्री. बंडू भोसले व हर्डीकर काका यांच्या हस्ते व  मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिकृतीचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज आगमन दीन साजरा करण्यात आला.

उत्सव साजरा करत असताना शाहूवाडी पंचायत समितीचे उपसभापती अमरसिंह खोत ह्यांनी भावनिक होत आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरील सुखरूप आगमनाचा दिवस असून स्वराज्यावरील मोठे संकट परतवून लावण्यात विशाळगड याचा मोठा वाटा आहे आणि ही संकल्पना विशाळगड व गजापूर मुस्लिम बांधवांनी मांडली आणि उत्सव रूपाने पूर्ण केली हेच खरे शिवप्रेमाचे प्रतीक आहे आणि आमच्या तालुक्यातील मुस्लिम हे शिवरायांचे मावळे आहेत ह्याचा ह्यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकत नाही असे गौरवोद्गार काढले. आजचा हा विशाळगड गजापूर मुस्लिम बांधवांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा उत्सव भविष्यात महोत्सव म्हणून आम्ही साजरा करू असा विश्वास उपसभापती अमरसिंह खोत ह्यांनी व्यक्त केला.


                जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद, वीर सिद्धी वाहवाह ह्यांचे बलिदान स्वराज्यासाठी होते हे आपण सर्वजण ध्यानात ठेवून छ शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला सर्वधर्मसमभाव जपणारा महाराष्ट्र आणि कोल्हापूर घडवूया आणि कोल्हापूर जिल्ह्याची पुरोगामी ओळख अबाधित ठेवूया असे आवाहन केले.


            मी मुस्लिम मावळा छत्रपतींचाचे प्रवक्ते इतिहास अभ्यासक अरबाज शेख म्हणाले की विशाळगड गजापूर येथे वास्तव्यास असणारे मुस्लिम हे शिवरायांच्या आणि राजघराण्याच्या पुण्यामुळेच अबाधित आहेत. गडावरील दर्गा आणि मस्जिद छत्रपती घराण्याच्या सन्मानामुळेच आज अस्तित्वात आहे ह्याचे भान ठेवत गडावरील बांधवांनी सुरू केलेला कार्यक्रम गडावरील बांधवांची शिवराय आणि राजघराणे संदर्भातील कृतज्ञता व्यक्त करत आहे उत्तर भारतीयांच्या राजकीय डावपेचात अडकून महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी शिवविचाराची प्रताडना करू नये असे केल्यास खपवून घेतले जाणार नाही. उत्तर भारतीय मौलवी यांच्या आहारी जाऊन उत्तर भारतीय राजांचे महत्व वाढत असल्यास तो शिवद्रोह आहे आणि कदापि स्वराज्य आणि शिवरायांच्या शत्रूचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही.


                  मी मुस्लिम मावळा छत्रपतीचा संघटनेचे संस्थापक सादिकभाई शेख म्हणाले की शिवरायांनी प्रत्येकाला आपले वाटेल असे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले आणि स्वराज्यात सर्व जाती धर्माचा आदर सन्मान केला गेला तसेच आज खऱ्या शिवविचारांची समाजाला गरज आहे. जर शिवविचारांनी आपण जोडले गेलो आणि बांधले गेलो तरच महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखण्याची क्षमता निर्माण करू शकेल. शिवद्रोह्यांना आणि भगव्या विरोधकांना महाराष्ट्रात थारा नाही. सादिकभाई पुढे म्हणाले की महाराष्ट्र मे रहेना होगा तो छत्रपती शिवाजी महाराज की जय कहेना होगा . छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा सन्मान, स्वातंत्र्य, त्याग, एकता, बंधुता बलिदान ह्याचा प्रतीक आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात भगवा लावण्यास अडथळा निर्माण केला जात असेल तर मुस्लिम मावळे गडावरच काय तर विरोधकांच्या छाताडावर भगवा लावेल आणि हे संपूर्ण महाराष्ट्र बघेल. सादिकभाई शेख पुढे म्हणाले की गड संवर्धन, गड सुशोभीकरण आणि इतिहासाचे जतन हा मुद्द्यावर काम झाले पाहिजे आणि ह्या तीन निकषानुसार गड संवर्धनाच्या आड येणारे अतिक्रमण - इतिहास अभ्यासक, राज घराणे प्रतिनिधी, पुरातत्व खाते आणि लोकप्रतिनिधी यांनी निश्चित करावे व ते निष्कासित करावे ह्याव्यतिरिक्स असणारा वास्तूचा योग्य निकाल लावावा आणि ह्या गडाची प्रसिद्धी छ शिवरायांच्या पराक्रम, वीरांचे बलिदान ह्यामुळे झाली पाहिजे जर इतर कारणांनी बदनामी झाली तर ते शिवप्रेम नसून शिवद्रोह मानला जावा.

मलकापूर नगरीच्या नगराध्यक्षा कोठावळे ताई यांनी हा उत्सवाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या

ह्याप्रसंगी विशाळगडाचे स्थानिक प्रमुख व्यक्तिमत्व बंडू भोसले ह्यांनी गडाची समता बंधुता एकता ह्याची परंपरा असून येथील हिंदू मुस्लिम पूर्वीपासूनच दरवर्षी एकत्रपणे शिवजयंती साजरी करतात असे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाळगड दर्ग्याचे ट्रस्टी मुजावर फरीद मुजावर,मकबुल मुजावर, अय्युब कागदी,अबुबकर मुजावर,मुबारक मुजावर,मूराद मुजावर, चांद मुजावर, मलिक मुजावर,मोहसीन मुजावर, शाहरुख मुजावर,भगवंतेश्वर मंदीर पुजारी निलेश काका हर्डीकर, उचत ग्रामपंचायत माजी सदस्य इम्रान जमादार, गजापूरचे इमाम प्रभुलकर, आलिशाब प्रभुलकर, सिराज प्रभुलकर, खैरुद्दीन मुजावर,अल्फाज मुजावर व इतर उपस्थित होते. राजधानी सातारा येथून अझर मणेर, आरिफ खान, मोहसीन बागवान, फिरोज शेख,रिजवान शेख, अजहर शेख, अझरुद्दीन शेख, शाहरुख शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला