फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
राजेंद्र बोन्द्रे
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
- बातमी शेयर करा
फलटण. : फलटण शहर व तालुक्यातील सर्वच ठिकाणी मिठाई विक्री केंद्र व्यापारी नियमांची पायमल्ली उघडपणे करत असताना सुद्धा
अन्न औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने कोणतीही कारवाई नागरिकांनी तक्रार देऊन सुद्धा होत नाही, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून
फलटण शहरात प्रत्येक चौकात मिठाई विक्री केंद्र च्या दुकानांनी गर्दी केली असून अन्न औषध विभागाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही नियमांचे पालन न करता ग्राहकांच्या आरोग्याचा खेळ वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा या प्रशासन विभागाचे अधिकारी फलटणला येऊन छोटे-मोठे फळ विक्रेत्यांच्या फळांचे नमुने घेऊन जात आहेत. आणि बाजूला असणाऱ्या मिठाई केंद्राकडे डोळे झाक करून निघून जात आहे. पण त्यांना बाजूला असणाऱ्या मिठाई विक्री केंद्रातला गोंधळ दिसत असून सुद्धा निघून जाण्याचा शिरस्ता या अधिकाऱ्यांनी का घेतला आहे, असा गंभीर सवाल फलटण शहरातील नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. मिठाईवर मिठाई बनवण्याची तारीख व वापरण्याचे अंतिम तारीख नमूद केली जात नाही नागरिकांनी मिठाई खरेदी करण्यास गेल्यावर खोटी उत्तरे देऊन मिठाई ताजी आहे असे सांगून मिठाई सारखेच गोड बोलून आपला मालक पुण्यात हे व्यापारी पटाईत असल्याचे दिसून येत आहे. अन्नसुरक्षा नियमानुसार सर्वच खाद्यपदार्थांची अशा प्रकारची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असताना सुद्धा या मिठाई केंद्रांमध्ये नियमांचे पालन न करता राजरोसपणे उल्लंघन होत आहे.
नागरिकांनी तक्रारी केल्यावर सुद्धा अन्न औषध प्रशासन अशा मिठाई केंद्रावर कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित झाल्यामुळे अन्न औषध प्रशासनाच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. या मिठाई केंद्रामध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अन आवश्यक प्रशासनाचा नक्कीच समजून येईल की याच्यावर तारीख पण लावलेली दिसून येत नाही आणि किती दिवसापूर्वी मिठाई विक्रीसाठी आणली आहे.
मिठाईची विक्री झाल्यावर बिल देणे आवश्यक असताना हे मिठाई दुकानदार कोणतेही बिल देत नाहीत, त्यामुळे ग्राहकाला तक्रारीसाठी सुद्धा पुरावा राहत नाही.
अन्न औषध प्रशासनाने या खाद्यपदार्थांचे मिठाईचे नमुने तपासणी गरजेचे आहे. मिठाई गोड पाकीट जड ,अशी धारणा आता नागरिकांची झाली आहे. याबाबत नागरिक अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. फलटण शहरातील या काही मिठाई केंद्रांच्या बाबत कालबाह्य झालेली अथवा शी ळी मिठाई तर काही मिठाई केंद्रांच्या बाबत तुपातली मिठाई म्हणून डालडा किंवा इतर तत्सम पदार्थांच्या बनवलेली मिठाई विक्रीस ठेवल्याचे निदर्शनास येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी चालू असणारा हा खेळ थांबण्यासाठी आणि आरोग्याच्या हितासाठी आता या संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना सुद्धा हे अन्न औषध प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने धडक कारवाया चालू असताना फलटणमध्ये मात्र प्रशासनाच्या वतीने उदासीनता दिसून येत आहे. मिठाई विक्री केंद्र कोणताही पायबंध नाही गुटखा विक्री चालू आहेत इतर अन्नपदार्थ विक्रेत्यांच्यावर कोणताही वचक नसल्याने मनमानी चालू आहे याबाबत अन्न औषध प्रशासन नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेणार का? शहरांमध्ये भोंगळकारभार दिसून येत असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असून या भावनांचा उद्रेक होण्याची वाट अन्न व औषध प्रशासन पाहत आहे का अशी धारणा आता होत आहे. अशाप्रकारे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा वृत्तीच्या मिठाई केंद्रावर कारवाई होणार का आणि त्यांना आळा बसणार का याची फलटणकर नागरिक वाट पाहत आहे.
नागरिकांची मागणी.
मिठाई केंद्रामध्ये विक्रीसाठी असलेल्या मिठाईवर मिठाई बनवण्याची तारीख आणि वापरण्याची मुदत अत्यावश्यक पणे दिसून आली पाहिजे. मिठाई केंद्रावर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज मधून काचेच्या आड ठेवलेल्या मिठाई किती दिवसापूर्वी दुकानात आणून ठेवले आहेत याची पडताळणी केल्यास त्या मिठाईचे बनवण्याची तारीख आणि कुठून बनवून आणली आहे अशा ठिकाणची माहिती ही ग्राहकांना देणे गरजेचे आहे. काही वेळा उत्पादक वेगळाच असतो आणि विकणारा वेगळाच असतो यामुळे नागरिकांच्या संभ्रम निर्माण होत आहे.
दुग्धजन्य पदार्थापासून बनवलेल्या मिठाया कालांतराने कालबाह्य होत असल्यामुळे अशा मिठाईंच्या बाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे.
फलटण शहरातील विशेषता आंबेडकर चौकाजवळ असणाऱ्या मिठाई केंद्र तसेच डीएड चौक येथील मिठाई केंद्रे याबाबत तर नागरिकांनी तक्रारी पण केलेली आहेत पण त्या तक्रारीचे अजून अन्न औषध प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे तातडीने कारवाई अपेक्षित आहे अशी नागरिकांची धारणा झाली आहे
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 9th Jul 2026 05:03 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Thu 9th Jul 2026 05:03 pm











