घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !

36 तासात दोषारोपपत्र दाखल उंब्रज पोलिसांची तत्परता

उंब्रज: फडतरवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे महिलेचा विनयभंग व शिवीगाळ दाखल गुन्ह्यात आरोपीच्या विरोधात उंब्रज पोलिसांनी अवघ्या 36 तासात पाटण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

       या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मौजे फडतरवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे फिर्यादी यांचे राहते घरी वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून फिर्यादी यांचा आरोपीतदीर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून विनयभंग केला होता याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.


   पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी महिला विषयक गुन्ह्यात तात्काळ कारवाई करून जलद गतीने न्याय मिळण्यासाठी लवकरात लवकर सखोल तपास करून दोषारोप पत्र माननीय न्यायालयात तत्काळ दाखल करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी API रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कचरे यांनी गतिमान तपास करून 36 तासात माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे. सदर कामी PSI सागर खबाले, रमेश ठाणेकर, पो हवा सचिन जगताप,पोशि श्रीधर माने, प्रकाश कार्वेकर, प्रफुल पोतेकर, विकास शिंदे , प्रशांत पवार  मदत केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला