फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार

फलटण : फलटण येथील गिरवी नाका परिसरात दोघे संशयित व्यक्ती विना नंबरप्लेटच्या मोटरसायकल वरुन फिरत असताना पोलिसांनी हटकले असता त्यातील एकाने हवेत गोळीबार करीत धूम ठोकली तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आले आहे.

 दरम्यान नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या घरी दिवसा ढवळ्या चोरी झाली. त्यामध्ये तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या अनुषंगाने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत शहरवासियांनी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. फलटण शहर व ग्रामीण भागातील अनेक गावात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातला असून चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात यशस्वी झाले असून गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदा या भुरट्या चोरट्यांनी लावला आहे. आजतर कहरच केला असून चक्क हवेत गोळीबार करून शहरात धुडगूस घातला व एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

 दरम्यान या गोळीबाराने फलटण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप हे चोरटे कोण आहेत व कोणाला ताब्यात घेतले आहे? याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला