औंध येथील आश्रमशाळेत भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा

औंध : शिवगर्जना प्रतिष्ठान औंध संचलित प्राथमिक, माध्यमिक व स्व. संभाजीराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, औंध (ता. खटाव, जि. सातारा) येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी भटके विमुक्त दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र भटके विमुक्त संयोजन समितीचे प्रतिनिधी श्री. वैभव यादव यांनी भूषविले. यावेळी आशा सेविका सौ. शबाना शेख, सौ. सिंधू पवार, सौ. शुभांगी बागल, सौ. संगिता घोरपडे, सौ. वंदना इंगळे व सौ. सविता कुंभार उपस्थित होत्या.

 कार्यक्रमाची सुरुवात श्री. वैभव यादव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व आशा सेविकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

 यावेळी गतवर्षी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भटके विमुक्त दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन पाहुण्यांनी केले.

    या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेसावळी यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

    कार्यक्रमास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर व श्री. दडस सर यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धर्मा इंगळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. माने सर यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला