चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत

वाई : वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे त्यानुसार वाई शहरास एक मोठी ओळख आहे. वाई शहरात आजुबाजुच्या गावातुन हजारोचे संख्येने लोक नोकरी रोजगार व शिक्षण व इतर बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी वाई शहरात येत जात असतात त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे.या मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व पो.कॉ विशाल शिंदे यांस योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्त्काळ छडा लावण्याबाबत मा.श्री जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक साो प्रभारी अधिकारी वाई यांनी आदेश केला दिलेल्या सूचनेनुसार चोरीला व घायाळ झालेले मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हेप्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र राज्याचे विविध भागामधुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत एकूण वीस मोबाईल व एक टॅब असा एकूण  ०४ लाख २० हजार रुपये किंमतीचे शोध घेऊन गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आले  जाने २०२४ पासुन एकुण ३०० विविध कंपन्यांचे नामांकित मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने तक्रारदार यांना परत केले आहेत.यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. तुषार दोषी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.कॉ विशाल शिंदे, पो.कॉ हेमंत शिंदे, पो.कॉ नितीन कदम,पो.कॉ श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, पो.कॉ महेश पवार(सायबर) यांच्या पथकाने केली आहे. मा. पोलीस अधिक्षक साो श्री तुषार दोषी व मा. अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला