वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.

सहा.पो.नि. मा.सुनिल जाधव आणि सरकारी वकील मा. वैभव काटकर यांनी पिडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला

पुसेसावळी  : ०२/०९/२०१८ रोजी विमल बळीराम क्षीरसागर यांचे राहते घरासमोर तारखेस वेळी व ठिकाणी फिर्यादी याची आजी सुशीला दादू ननावरे (मयत) हे कोंबड्या राखत बसलेले असताना फिर्यादीचे घरात राहणारा आरोपी याने तिचे डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून तिचा खून केला म्हणून वगैरे मजकुराची खबर दिल्याने १४०/२०१८ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


 सदर गुन्ह्यात औंध चे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरिक्षक मा.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दप्तरी पो.ना. डी.वाय. देवकुळे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपीं विरुद्ध मा.अति.जिल्हा व सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति.जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री. वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा.अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश वडुज श्री.व्ही.बी. काकतकर साहेब यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून आज दि.३१/०७/२०२५ रोजी आरोपी - प्रशांत उर्फ संतोष विश्वनाथ ननावरे रा. अंभेरी ता. खटाव जि.सातारा यांस भा.द.वि.स कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १०,००० रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. 


 सदर खटला चालवणे कामी विद्यमान उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज, श्रीमती. अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश मते, औंध पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्कॉड पोलिस कॉन्स्टेबल मा.जयवंत शिंदे, औंध पोलीस स्टेशन तसेच पो.उप. नि.दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ.अमीर शिकलगार, पो.कॉ.सागर सजगणे यांनी सहकार्य केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला