औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.

औंधमा.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.तुषार दोषी, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. वैशाली कडुकर, मा.पोलीस उपअधिक्षक, दहिवडी विभाग कॅम्प वडूज, श्रीमती. आश्विनी शेंडगे, यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहायक पोलिस निरीक्षक,औंध, श्री.अविनाश मते यांनी औंध पोलीस स्टेशन अंतर्गत पथक तयार करून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मा.सहायक पोलिस निरीक्षक, औंध श्री.मते यांच्या आदेशानुसार सायबर चे कर्मचारी पो.काँ. अतुल देशमुख आणि क्राईमच्या महिला पो. कॉं. मेघा फडतरे यांनी सी.ई.आय.आर. पोर्टल व तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील मोबाईल शोध मोहीम राबविल्याने जुन व जुलै २०२५ महिन्यांमध्ये औंध पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांचे गहाळ झालेले एकुण ३,००,०००/- रूपये किंमतीचे एकूण २३ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस कॉंस्टेबल पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरचे मोबाईल श्री.मते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, औंध यांचे हस्ते ओळख पटवून तक्रारदारांना आज रोजी परत करण्यात आले. यावेळी सदरची मोहीम यापुढेही अशीच अविरतपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मा. पोलिस उपनिरीक्षक, औंध, सतिश दत्तात्रय मयेकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रीमती. सौजन्या मोरे, पो. कॉं. साहिल झारी, पो. हवा, प्रविण करांडे यांचेसह तक्रारदार मोबाईल चे मालक उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला