शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूलचे एन. एम .एम. एस. परीक्षेत घवघवीत यश

सातारा : 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ साताराच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल या शाळेत एन. एम .एम. एम. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व सारथी शिष्यवृत्ती  पात्र विद्यार्थी अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव माननीय श्री तुषार पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात एकूण 26 विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस सारथी शिष्यवृत्ती तर 3 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती ही प्राप्त झाली आहे अशा सर्व गुणवंत  विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे कौतुक केले गेले. त्याचबरोबर मंथन आणि इंडियन टॅलेंट सर्च या परीक्षांसाठी अबोली म्हेत्रे याचबरोबर चित्रकला राज्य स्तरीय सनथ जाधव आणि राष्ट्रीय,राज्य पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रोख बक्षीस देण्यात आली.ज्या शिक्षकांनी आटोकाट प्रयत्न केले अशा शिक्षकांना विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला गेला याप्रसंगी शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कु. पायल माने हिने सर्व शिक्षकांचे तसेच  संस्थेने केलेले विशेष प्रयत्न याविषयी थोडक्यात माहिती सांगितली शाळेच्या शिक्षिका सौ ज्योती सातपुते मॅडम यांनी या परीक्षेसाठी संस्थेचे सचिव माननीय तुषार पाटील यांनी केलेल्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाविषयी माहिती सांगितली तसेच शिक्षण प्रसारक संस्थेच्या चेअरमन माननीय सौ प्रतिभा चव्हाण मॅडम यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अमर वसावे तसेच विद्यार्थी ,शिक्षक. पालक तसेच करंजे गावातील  ग्रामस्थ उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एम एम एस विभाग प्रमुख सौ वृषाली कुंभार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ लताराणी ननावरे मॅडम यांनी मानले.संस्था अध्यक्षा सौ. डूबल मॅडम,उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत,नंदकिशोर जगताप, धनंजय जगताप,हेमकांची यादव यांनी यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त