सांगली शिकलगार युवक संघटनेचा कार्यकम आदर्शमय व गौरवशाली : नौशाद शिकलगार
निसार शिकलगार - Thu 3rd Nov 2022 09:41 am
- बातमी शेयर करा
शिकलगार समाज कष्टातून प्रगती करत असून भट्टीवर काम करणारे बांधव आमचा अभिमान आहे. या बांधवांचा सत्कार समारंभाचे आयोजन करून युवक संघटनेने एक चांगला आदर्शमय व गौरवशाली उपक्रम राबविला आहे. युवक संघटनेने येत्या काळात याच प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवावेत देशभरातील शिकलगार संघटना त्यांच्या मागे शक्ती उभा करेल असे प्रतिपादन अखिल भारतीय शिकलगार समाज संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी केले.
सांगली जिल्हा युवक संघटनेचे तिसरे अधिवेशन खानापूर जिल्हा सांगली येते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी नौशाद शिकलगार बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शमा शिकलगार या होत्या या कार्यक्रमास सलीम शिकलगार, अब्दुल गणी शिकलगार, नसरुद्दीन शिकलगार, युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष याकुब शिकलगार,उपस्थित होते. पुढे बोलताना नौशाद शिकलगार म्हणाले राज्यात शिकलगार समाज हा मोठ्या प्रमाणात असून या समाज संघटनेची ताकद मोठी आहे. या ताकतीच्या जोरावर समाजाला विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल मात्र त्यासाठी एक जुटीने पाठपुरावा करण्याची गरज आहे. उपेक्षित लोकांना प्रवाहात आणण्यासाठी काम करावे लागेल, असे आवाहन अखिल भारतीय समाज संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी केले. यावेळी नसरुद्दीन शिकलगार, अब्दुल गणी शिकलगार, चंदू शिकलगार सर,युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष याकूब शिकलगार, हाजराभी शिकलगार आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात भट्टीवर लोहारकाम करणाऱ्या समाज बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील युवक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांचा आदर्श घेऊन या पुढील काळात अशा प्रकारचे युवकांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम करावे.
अखिल भारतीय शिकलगार संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 3rd Nov 2022 09:41 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 3rd Nov 2022 09:41 am













