आमदार महेश शिंदे मंत्रिमंडळात दिसावेत...खटाव-कोरेगावच्या जनतेची मागणी

खटाव: खटाव – कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत ४५ हजारांहून अधिक मताधिक्याने आमदार महेशजी शिंदे निवडून आले आणि मतदार संघातील जनतेनं अक्षरशः दिवाळी साजरी केली. आनंदोत्सव साजरा झाला, हारतुरे झाले, सत्कार झाले, अभिनंदन झाले. पण खटाव- कोरेगावच्या मतदार बंधू भगिनींचे लक्ष लागून राहिले आहे नवीन मंत्रीमंडळाच्या स्थापनेकडे. कारण खटाव – कोरेगावच्या जनतेची मागणी आहे की आमदार महेश शिंदे मंत्रिमंडळात दिसावे. 

       निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा प्रचंड मतांनी पराभव केला. कोरेगावच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश माझा भरवशाचा बॅटस्मन आहे व त्याचा यथोचित सन्मान केला जाईल असा शब्द कोरेगाव मधील जनतेला सभेत दिला होता. तोच शब्द खटाव कोरेगावला मंत्रिपद देऊन खरा ठरवावा, अशी अपेक्षा मोठ्या आशेने येथील जनता करत आहे. 

 यापूर्वी देखील सरकारने आमदार महेश शिंदे यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष देऊन राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता. ते काम देखील आमदार महेश शिंदे यांनी लिलया पेलले होते.तसेच महेश शिंदे यांच्या कामाची वेगळी पद्धत व आवाका देखील मोठा असल्याचं मतदार संघात बोललं जातं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला सातारा जिल्हा देखील महायुतीमय करण्यामागे देखील आमदार महेश शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे येथील जनतेच्या नजरा आता नव्याने होणाऱ्या मंत्री मंडळांकडे लागल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त