मारहाण प्रकारात 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फलटण :  मिनी साउंडच्या स्पर्धेवेळी झालेल्या वादाच्या कारणावरून पाच जणांना मारहाण केल्याप्रकरणी सुमारे 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिनी साउंडच्या स्पर्धेवेळी झालेल्या वादाच्या कारणावरून अरबाज अमीर शेख, अमीर शेख, असलम शेख, एहमद शेख आणि आशिष जाधव यांना लाथाबुक्क्यांनी, दांडक्याने, लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी हर्ष रोहिदास नलवडे, अमित आप्पा तांदळे, संकेत गणेश कापसे, आकाश दत्तात्रय माने, नोहेल तांदळे, संकेत अलगुडे आणि इतर 15 ते 16 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हर्ष रोहिदास नलवडे, अमित आप्पा तांदळे, संकेत गणेश कापसे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 5 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त