देशी बनावटीचे 4 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले,
Satara News Team
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
- बातमी शेयर करा

शिरवळ : सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने शिरवळ येथील शिंदेवाडीनजीक असलेल्या एका कंपनीच्या मैदानावर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास रंगेहात पकडले, तर त्याचा साथीदार पळून गेला. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने देशी बनावटीचे ४ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे असा २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय २४, रा. महर्षीनगर, स्वारगेट, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, दिग्विजय ऊर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस, पुणे) हा पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे व त्याचा साथीदार दिग्विजय ऊर्फ सनी देसाई हे शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर एका कंपनीच्या कंपाउंडजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सातारा गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिंदेवाडी गावच्या हद्दीतील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर कंपनीच्या कंपाउंडजवळ सापळा रचण्यात आला. पथकामधील पोलिस कर्मचारी संशयितास पकडण्यासाठी दबा धरून बसले. दरम्यान, दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी दोन व्यक्ती दुचाकीवरून पुणे बाजूकडून एका कंपनीच्या बाजूकडे येताना दिसले.
त्या वेळी त्यांना थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र, दुचाकी चालकाने गाडी थांबविली नाही. पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी खाली ओढले. मात्र, चालक पळून गेला. या वेळी दुचाकीवरून खाली ओढलेला व्यक्ती पळून जात असताना त्यास पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत काळ्या रंगाच्या बॅगेत देशी बनावटीची ४ पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली. पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, हवालदार लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, शिवाजी भिसे, सचिन ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक बातम्या
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज २६/६/२०२५ गुरुवार
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
संबंधित बातम्या
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
-
प्रेमप्रकरणातून अपहरण झालेल्याची सुटका
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
-
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ धक्कादायक प्रकार
- Tue 3rd Dec 2024 11:34 am
-
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Tue 3rd Dec 2024 11:34 am