पाडेगाव येथे कृषी दूतांचे फळ झाडाचेरोप देऊन स्वागत..

पाडेगाव ता. खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी "ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व कृषि जोड प्रकल्प" या कार्यक्रमा अंतर्गत पाडेगाव येथे दाखल झाले. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहेत. पाडेगाव येथील ग्रामपंचायतमार्फत कृषीदूतांचे फळझाडाचे रोप देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी पाडेगावाचे सरपंच, उपसरपंच , सदस्य, वि. का.सो. चे पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी पदवी अभ्यास क्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो. या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. 

     तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध प्रकल्पाद्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत कृषी दूत इंगोले धनंजय , केसकर राहुल, कांबळे रोहन , रणवरे शिवतेज, धुमाळ श्रीजीत, गोडसे आदित्य, काटकर सौरभ हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषीदूत कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त