सातारा शहरातील काही भागांत जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शुक्रवार आणी शनिवारी पाणीपुरवठा बंद

सातारा :  शहरातील काही भागांत पालिकेकडून कासचा पाणीपुरवठा करण्यात येतो. कासच्या जलवाहिन्यांना गळती व जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या शुक्रवार (ता. २९) आणि शनिवार (ता. ३०) होऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सातारा शहरातील शनिवार पेठ, ५०१ पाटी, दुर्गा पेठ आदी पेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. 

काही ठिकाणी नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीही आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत थोडी उसंत घेत असतानाच आजी-माजी नगरसेवकांच्या कानावर आता नागरिकांच्या पाण्याविषयीच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. दरम्यान, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील सदाशिव पेठेतील जलवाहिनीच्या तपासणीचे काम पूर्ण केले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

 कास येथे मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने तसेच सांबरवाडी, पॉवरहाऊस येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम असल्याने उद्या शुक्रवारी दि. २९ रोजीपासून साताऱ्यातील पोळवस्ती, संत कबीर सोसायटी, बालाजीनगर, कांबळेवस्ती, जांभळेवाडा तसेच कात्रेवाडा टाकीत सायंकाळी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. शनिवारी सकाळी पॉवर हाऊस येथून होणारा पाणीपुरवठा होणार नाही. यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा पेठ, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकी या टाक्यांच्या माध्यमातून वितरण होणाऱ्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त