फलटण येथील श्रीराम रथ उत्सवाची सुरुवात

फलटण:  फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुनामाता आईसाहेब महाराज यांच्या प्रेरणेने 260 वर्षांपूर्वी या श्रीराम रथयात्रेची परंपरा सुरू झाली आहे. दरवर्षी मार्गशीष शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच देव दिवाळीच्या शुभ दिवशी प्रभू श्री रामचंद्रांची रथयात्रा संपन्न होते. फलटणकरांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्या रथ यात्रेचा सोमवार दिनांक 2 डिसेंबर हा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी आठ वाजता प्रभू श्रीरामांची मूर्ती रथामध्ये स्थानापन्न करण्यात येईल, आणि दरवर्षीच्या परंपरागत मार्गाने फलटण नगरीतून हा रथ फलटणच्या भाविक भक्तांसह नगर प्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळी सात वाजता करत सोहळा श्रीराम मंदिरात परत येईल. 

      परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे या श्रीराम रथ उत्सवाला बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. दरवर्षीच्या परंपरेनुसार रोज रात्री 9 ते 11 या वेळेत प्रभावळ अंबारी शेष गरुड आणि मारुती या पाच वाहनांद्वारे मंदिराच्या आवारात मिरवणूक काढण्यात येते. हा सोहळा पाहण्यासाठी फलटण व आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांची गर्दी दिसून येत आहे. रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत प्रभू श्रीरामांच्या रथाला लघुरुद्राभिषेक करण्यात येईल आणि रथाची सजावट करून सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत श्रीराम मंदिरात कीर्तन होऊन प्रभू रामचंद्रांची रथोत्सवाची मूर्ती नाईक निंबाळकर राजघराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथामध्ये स्थानापन्न करण्यात येईल आणि नगर प्रदक्षिणेला सुरुवात होईल त्यानंतर शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी श्रींची पाकाळणी सकाळी काकड आरती आणि नंतर अकरा ब्राह्मणांच्याकडून लघुरुद्र व महापूजा करण्यात येईल. व या यात्रेची सांगता होईल. 

   फलटण शहरात फार पूर्वीपासून दरवर्षी दोन मोठे धार्मिक सोहळे पार पडतात. यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ते पंढरपूर असणारी पायी वारीचा पालखी सोहळा आणि श्री राम रथोत्सव, या दोन्ही सोहळ्यासाठी फलटण व तालुक्यातील नोकरी व्यवसाय निमित्त बाहेर इतर ठिकाणी असणारे फलटणकर आवर्जून हजेरी लावतात. आणि या दोन सोहळ्यांच्या माध्यमातून मागील चार-पाच पिढ्यापासून वारकरी संप्रदाय आणि श्रीराम भक्तांची वाढ दिवसेंदिवस फलटण येथे दिसून येते. आजही फलटणकर सकाळी श्रीरामाचे दर्शन घेऊन आपल्या दैनंदिन कार्याला सुरुवात करतात. मागील दोन दिवसापासूनच या रथोत्सवाची चाहूल फलटणकरांना झाली आहे कारण छोटे मोठे व्यवसायिक यांची दुकाने येण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व गरजू उपयोगी वस्तूंची दुकाने शेतीशी निगडित असणारी दुकाने महिलांची आभूषणे तसेच मेवा मिठाईची दुकाने आणि मोठे मोठे पाळणे यांची लगबग शहरांमध्ये दिसून येते तसेच खेळण्याची दुकाने आणि करमणुकीचे स्टॉलची नेहमी आपली हजेरी लावत असतात.

     या रथोत्सवाच्या निमित्ताने सातारान्यूज चा वतीने श्री.राजेंद्र बोंद्रे यांनी आढावा घेतला असता फलटण नगरपरिषद स्वच्छता आणि इतर काही सुविधा करण्यासाठी कार्यरत आहे तसेच वाढती गर्दी ग्राह्य धरून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त