पालकमंत्र्यांच्या तालुक्यात उज्वला गॅस पात्र लाभार्थ्यांकडून गॅस वितरका कडून थेट लुट
राजेंद्र डांगे
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
- बातमी शेयर करा
सासपडे:- केंद्र सरकारने आपल्या देशातील गरीब जनतेच्या हितासाठी राबविलेल्या योजना पैकी प्रधानमंत्री उज्वला योजना आहे.
देशात बहुसंख्य कुटुंब हे आर्थिक परिस्थितीने गरीब असल्यामुळे त्यांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे ते चुलीवर जेवन बनवतात.चुलीवर जेवन बनवल्यामुळे वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्या चुलीच्या धुराचा त्रास होतो व ते दम्या सारख्या आजारांना बळी पडतात या सर्व गोष्टींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्वला योजना संपूर्ण भारतात सुरू केली. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कनेक्शन साठी भारत सरकारद्वारे गॅस वितरकांना रोख मदत करते. (१४.२ किलो सिलेंडर, प्रेशर रेग्युलेटर, एलपीजी नळी, ग्राहक कार्ड, तपासणी/मांडणी/प्रात्यक्षिक शुल्क ) याव्यतिरिक्त प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्या ( ओएमसी) तर्फे पहिले एलपीजी रिफील आणि स्टोव्ह मोफत दिले जातात. परंतू तारळे तालूका पाटण येथील सरकार मान्य मे.दिपलक्ष्मी गॅस वितरकाने गरजू आणि गरीब लाभार्थ्यांना स्टोव्हच्या खरेदीपोटी प्रत्येक लाभार्थ्यांकडून ४०० रू ( विना पावती ) घेऊन कनेक्शन दिले जात आहे.ही लुट कोणाच्या खिशात जात आहे.अधिकारी की प्रतिनिधी यापैकी कोणाचा वरदहस्त या वितरकाला लाभला आहे. याबाबत आमच्या पत्रकाराने वितरकाला विचारले असता सदर रक्कम ही स्टोव्हची घेत असल्याचे सांगितले.
रिफील आणि स्टोव्ह ठेव मुक्त असताना सुद्धा हा वितरक कोणाच्या मदतीने गरीब जनतेच्या पैशावर दरोडा घालत आहे. याबाबत काही पात्र लाभार्थी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे ( नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगितले. सदर वितरकाने उज्वला योजनेअंतर्गत किती कनेक्शन दिली व किती लुट केली याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.
पालकमंत्र्यांच्या तालुक्यात अशी निंदनीय प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रत्यक्ष पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी लक्ष घालून या वितरकाला कोणाचे पाठबळ आहे याची चौकशी लावावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 24th Jan 2024 12:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 24th Jan 2024 12:15 pm













