विद्यार्थ्यांनी सहज शिक्षा ॲप चा फायदा घ्यावा: मनोजदादा घोरपडे

देशमुखनगर : कराड उत्तर निवडणूक प्रमुख मा. मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून सहज शिक्षा ऑनलाइन शिक्षा ॲप  कराड उत्तर मधील प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ रहीमतपूर येथील पंचकोशी शिक्षण संस्थेमध्ये करण्यात आला यावेळी पंचक्रोशी संस्थेच्या अध्यक्षा सौं.चित्रलेखा माने कदम ताई, माजी सभापती भीमरावकाका पाटील, विरोधी पक्ष नेते निलेश माने, सहज शिक्षा अपचे संस्थापक अध्यक्ष विशाल अमलापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना मनोज दादा म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग क्लास लावणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. किंवा कलासेस ची सोय नसते.आणि ऑनलाईन लर्निंग ॲप घ्यावे तर पालकांच्याकडे तेवढे पैसे नसतात. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते दहावी साठी मराठी मिडीयम, इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश च्या विद्यार्थ्यांना 7000 रुपये किमतीचे ॲप मोफत देण्यात येणार आहे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा व आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याचा प्रयत्न करावा हे ॲप वापरायला अतिशय सहज आणि सोपं असल्याकारणाने विद्यार्थ्यांची त्याच्याप्रती आवड वाढत चालली आहे पालकांना सुद्धा यामध्ये विद्यार्थ्यांची टेस्ट घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे हे ॲप कराड उत्तर मधील अंदाजे 30000 विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा माणस आम्ही येत्या काही दिवसांमध्ये केला असून हे ॲप संपूर्णतः मोफत दिले जाणार आहे.
         यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष चित्रलेखा माने  कदम भीमराव काका पाटील निलेश माने यांनी मनोगत व्यक्त केले सदर उद्घाटन सोहळ्यास रणजीत माने, तुषार माने, विक्रम माने, दत्तात्रेय जाधव विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला