मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
Satara News Team
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
- बातमी शेयर करा

आयुष्यात असंख्य वळणावर परमेश्वर आपल्याला एक सच्चा साथीदार पाठवत असतोच. आपण फक्त त्याला ओळखायचे असते. आपल्या आजूबाजूला असंख्य व्यक्ती असुनसुद्धा एका विशिष्ट व्यक्तीकडे आकर्षित होतो व हेच आकर्षण पुढे मैत्रीत रूपांतरित होते. आपल्या मनाला एक सुंदर अनामिक, ओढ लावणारं नातं म्हणजे मैत्री. मैत्रीपूर्ण नातं कधीही विसरता येत नाही ते कायम सोबतच असते.
खरंच, मैत्री हा शब्दच मनाला आल्हाददायक आणि आनंद देणारा आहे. मैत्रीचं नातं असं निर्माण केलं आहे की त्याला कोणत्याच पारड्यात मोजता येणार नाही. निखळ मैत्री त्यातून मिळणारा आनंद याचं एक स्वतंत्र वजन असतं. मैत्री करत असताना कोणतंच बंधन नाही. आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि हे स्वाभाविक आहे. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळवण्यासाठी गरज असते ती स्वतः वर विश्वास ठेवण्याची,जाती - पातीची बंधणे,ना गरिब ना श्रीमंत, ना शिक्षणाचे ना वयाचे बंधणे झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजुला सारण्याची, विशाल हृदय संवेदनशील मन जपण्याची, दुसऱ्यांना व्यवस्थितपणे समजून घेण्याची. दोन समविचारी व्यक्ती एकत्र आले की तिथे निर्माण होते तीच खरी मैत्री..........! सुखदुःखाच्या प्रसंगी एकत्र आलं की मैत्री अधिक दृढ होत जाते. या मैत्रीत सदैव मायेचा ओलावा असतोच. विचारपूस,काळजी प्रसंगी भांडण ,रडणं, हसणं, अबोला , यामुळेच परिपक्वता येते.
तसं पाहिलं तर खरी मैत्री कधीच सिद्ध करावी लागतं नाही. प्रसंगानुसार एकत्र आलेल्या दोन व्यक्तींमध्ये कालानुरूप मैत्री अधिक पक्की होत जाते. विचारांची आदानप्रदान, एकमेकांची सुखदुःख जाणून त्यावर केलेलं चिंतन म्हणजेच मैत्रीचं भांडवल. मानवी आयुष्यात सगळ्या नात्यात कायम आनंदात प्रफुल्लित राहिलं असं नातं म्हणजेच मैत्री ........!
खऱ्या मैत्रीत जो आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो तो खरंच स्वर्गीय असतो. मैत्रीला कधीही कुठलीही बंधनं नसतात. मैत्रीत राग हवा, भांडण ही हवेत, पण प्रत्येक भेटीत प्रेम आणि आत्मियता असावी. सच्चा मैत्रीत चुक दाखवणारा व चुक मान्य करणारा व समजून घेणारा असावा.
आयुष्यात असंख्य लोक जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात. त्यातील अनेकांशी ताटातूटही होतं. पण मैत्री झाल्यानंतर ते संबंध कायम राहतात. कित्येक जणांमुळे मैत्रीत धोका पण निर्माण होवू शकतो. पण आपल्या सोबतवर आपला विश्वास हवा. कमळाच्या फुलातील परागकण खाण्यासाठी भुंगा ज्या प्रमाणे त्यांच्या आजूबाजूला परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील दुर्गुणांकडे दुर्लक्ष करुन आपल्यात चांगला बदल घडवायला मदत करणारा अवलिया म्हणजेच आपला सच्चा साथी म्हणजेच जिवलग मित्र.......!
मैत्री व्हायला वेळ लागत नाही. पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो ! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातुन निर्माण होणारे एक सुमधुर गाणी ! मैत्री जुळते ओळखीमुळे , पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या सान्निध्यात आल्यानंतर जो 'माणूस' तयार होतो तो खरा मित्र अन् तिच खरी मैत्री.......!
आयुष्यात जवळच्या खुप व्यक्ती तुटतात, पण खरे मित्र असतात हृदयाच्या ढासळलेल्या भिंतींना नव्याने उभे करणारे कारागीर, आशेचे नवे नवे रंग देणारा रंगाडी, आपल्या जिवलगाच्या जीवनात प्रेरणा देणारा प्रेरणास्रोत, मित्र वाईट मार्गाने जाताना रोखणारे, प्रसंगी चुक दाखवून मारणारे, मित्राचे कौतुक करणारे.
या स्वार्थी जगात गंगेच्या पाण्याइतकाच निर्मळ असणाऱ्या , मित्रांमधील मरगळ दूर करण्याची गरज पडली की मेणाहून मऊ आणि दगडासारखा कठीण बनणाऱ्या , मित्राची व मैत्रिची नितांत गरज आयुष्यात असते. अशेच जिवलग माझ्या आयुष्यात सोबत आहेत याचं मी भाग्यच समजतो.
जगाचा थोडा विचार न करता आपल्या मित्राच्या सुख दुःखालाच जग मानुन त्यांच्यासाठीच झटणाऱ्या, आपल्याजवळ असणारे ज्ञान आपल्या मैत्रीसाठी देऊन त्याला उभं करणारा सोबती म्हणजेच खरा मित्र......! मला असं वाटतं , माणुसकीने भरलेल्या माणसाशी सच्ची मैत्री व्हायला वेळ लागत नाही.
मैत्रीत निभावणारा जर पक्का असेल तर हातात हात द्यायला कसलीही भिती वाटत नाही. कारण मैत्रीत फक्त विश्वास, आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा, माया असावी लागते. कारण निसर्गाच्या नियमानुसार उन्हाळे पावसाळे येतील पण जातील पण, पण गरजेच्या वेळी आधाराचा हात जेव्हा आपल्या खांद्यावर असतो . ती गोष्ट माणसाला पुन्हा नव्याने जीवन जगायला भाग पाडते..... आयुष्यात भेळ आणि खेळ करणारे करणारे लाख भेटतील , त्यामुळे लाखोंच्या गर्दीत असे हात आपल्या खांद्यावर असावे असावे. असावे म्हणजेच जीवनाची खरी मज्जा घेता येते. आणि देता येते. यालाच सच्ची मैत्री मैत्री म्हणतात.
लेखक : तुषार शामराव कदम
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Fri 22nd Sep 2023 11:10 am
-
जाणून घ्या 12 राशींसाठी रक्षाबंधनाचा दिवस कसा आहे
- Fri 22nd Sep 2023 11:10 am