सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ

आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. 


मेष राशी : मेष राशीच्या व्यक्तींना आज लाभ होणार आहे. धनलाभ होण्याचा योग आहे. महत्त्वाची कामे आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. संध्याकाळच्या सुमारास घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आजचा शुभ रंग - निळा.


वृषभ राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. दिवसभरात काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. शुभ कार्यासाटी पैसे खर्च होतील. आजचा शुभ रंग - लाल.


मिथुन राशी : उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातारवण असेल. दिवसभरात आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. आजचा शुभ रंग - पिवळा.


कर्क राशी : आजचा दिवस नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच लाभदायक असणार आहे. व्यवसायात चांगली वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण करा. आजचा शुभ रंग - जांभळा.


सिंह राशी : आजच्या दिवसाची सुरुवातच लाभदायक होणार आहे. कोणत्याही कामाची सुरुवात करताना घाई-गडबड करु नका. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळतील. संध्याकाळनंतर दूरचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.


कन्या राशी : आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल. दिवसभरात धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.


तूळ राशी : आजचा दिवस लाभदायक असणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागेल. व्यापार वाढीचा योग आहे. मान-सन्मानात वाढ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.


वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न कराल. विरोधकांकडून अडचणी निर्माण केल्या जाण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - लाल.


धनु राशी : हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. धनलाभ होण्याचा योग आहे. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. पैशांची बचत करा अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आजचा शुभ रंग - केशरी.


मकर राशी : कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.


कुंभ राशी : मित्रांसोबत मिळून नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - जांभळा.


मीन राशी : धन समृद्धीत वाढ होईल. मात्र, खर्च होणाऱ्या पैशांमुळे चिंता सुद्धा वाढेल. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. मुलांसोबत वेळ घालवाल. आजचा शुभ रंग - पांढरा.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला