शाहूपुरीतील उद्यान, स्विमिंग पुलाचे काम लवकर पूर्ण करा आ. शिवेंद्रसिंहराजे;

पालिकेचे अधिकारी, ठेकेदाराला केल्या सूचना

सातारा :  शाहूपुरी येथील रांगोळे कॉलनी येथे सुसज्ज आणि सुंदर उद्यान तसेच प्रशस्त स्विमिंग पूल उभारणीचे काम सुरु झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सातारा शहराच्या आणि पर्यायाने शाहूपुरीच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे. हे काम दर्जेदार करून काम लवकर पूर्ण करा, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा पालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला केल्या.

आ. शिवेंद्रसिंराजे यांच्या विशेष प्रयत्नातून रांगोळे कॉलनी येथे उद्यान विकसित करण्यासाठी दीड कोटी  आणि स्विमिंग पूलबांधण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भारत भोसले, राजेंद्र केंडे, अक्षय जाधव, नवनाथ जाधव, नितीन तरडे, विश्वतेज बालगुडे, विकास देशमुख, निलेश धनावडे आदी उपस्थित होते.

उद्यानात सुरु असलेल्या वॉकिंग ट्र्क, गजिबो व इतर कामांची आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पाहणी करून या जागेची चांगली स्वच्छता ठेवा तसेच आवश्यक त्या ठिकाणी वृक्षारोपण करून उद्यानाचे सौंदर्य कसे वाढेल याची दक्षता घ्या, आदी सूचना आ. शिवेंद्रसिंराजेंनी केल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला