दहिवडी नगरपंचायत निवडणूक लढणार आणि जिंकणारही: अनिकेत शिंदे

दहिवडी : शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी व वडूज नगरपंचायत निवडणुका ताकतीने लढवल्या जाणार आहेत.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शेखर गोरे यांनी पायाला भिंगरी बांधत मतदारसंघात दौरे वाढवले आहेत.नुकत्याच झालेल्या म्हसवड परिषद निवडणुकीतही होम टू होम प्रचार करत आपला करिष्मा दाखवून दिला होता.त्यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे व कार्यकर्त्यांच्या प्रचारामुळे म्हसवड नगरपरिषद २१/० करण्यास मदत झाली होती.दहिवडी नगरपंचायतीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीतही आपला करिष्मा विरोधकांना दाखवून दिला होता.


त्याच पार्श्वभूमीवर काही महिन्यातच दहिवडी नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यकाळ संपत आहे.सातारा जिल्हा हा शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे.जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी व वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेत जुन्या,नव्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळ घालून नवीन संघटना बांधण्यासाठी शेखर गोरे प्रयत्नशील आहेत.


त्याच पार्श्वभूमीवर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या प्रभाग सहाकडे शेखर गोरे यांचे विशेष लक्ष आहे.कार्यकर्ते,मतदार यांच्या ते कायमच संपर्कात असतात.त्या प्रभागात त्यांना मानणारा युवकांचा मोठा गट आहे.त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीला शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत लढणार आणि जिंकणारही असे मत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शेखरभाऊ गोरे यांचे विश्वासू समर्थक अनिकेत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. 


प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,शेखरभाऊ गोरे यांनी सुरुवातीपासूनच प्रभाग सहाकडे विशेष लक्ष दिले आहे.प्रभाग सहाकडे सत्ताधाऱ्यांकडून कायमच दुर्लक्ष झाले आहे.गेली दहा वर्षे एकही विशेष विकासकाम करण्यात आलेले नाही.त्या विरोधात लढा उभारणार आहे.शेखरभाऊंनी आमच्यासारख्या असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेळोवेळी ताकद दिली आहे.पाच वर्षात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असूनही विकास कामात झुकते माप मिळाले नाही,त्यामुळे प्रभागातील सहकारी व नागरिकांच्या मागणीनुसार मी प्रभाग सहा मधून लढणार व जिंकणारही आहे.शेखर भाऊ बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण,यानुसार भविष्यात काम करेन.असेही ते म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

 पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला