दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?

साताऱ्यात जयकुमार गोरेंच्या राजकारणामुळे पक्षाची पिछेहाट ?

सातारा : सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या राजकीय वाटचालीवरून सध्या चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्याऐवजी पक्षाला मित्रपक्षांशी संघर्षाच्या भूमिकेत उभे केले जात आहे का? ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय कार्यपद्धतीमुळे भाजपला जिल्ह्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे का? असे प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागले आहेत.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून महायुतीतील मतभेद चर्चेत आले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही राजकीय समीकरणे तापली. भाजपने महायुतीचा धर्म पाळला, मात्र मित्रपक्षांनी साथ दिली नाही, असा आरोप खुद्द जयकुमार गोरे यांनी केला. स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर भाजपला अधिक जागा मिळाल्या असत्या, असाही दावा त्यांनी केला.

मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याची गरज असताना वारंवार संघर्षाची भूमिका घेतल्याने पक्षाचे नुकसान तर होत नाही ना?

भाजपमधील इतर स्थानिक नेत्यांशी समन्वय, मित्रपक्षांशी संबंध आणि जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाचे संतुलन या मुद्द्यांवर आता चर्चा होणे गरजेचे आहे.

जयकुमार गोरे यांच्या राजकीय भूमिकेमुळेच साताऱ्यात भाजपला वाईट दिवस येत आहेत का, की पक्षातील इतर अंतर्गत कारणेही त्याला जबाबदार आहेत? हा प्रश्न सध्या साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

वारंवार मात्र शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी चुकीचं वक्तव्य करून डिवचन्याचा प्रकार जयकुमार गोरे यांच्याकडून होत असताना विरोधक किती गप्प बसणार कळीचा नारद मुणी असल्यागत काही ना काही त्यांच्या विरोधात बोलून पक्षश्रेष्ठींना खुश करून पक्ष वाढवता येत नाही हे जयकुमार गोरेंना वेळ आल्यावर समजेल.

आता भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या परिस्थितीकडे कसे पाहते आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे सुधारण्यासाठी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

सत्तेची ताकद आणि राजकीय वर्चस्व यांचा गर्व किती काळ टिकतो, हे इतिहासाने अनेकदा दाखवून दिले आहे. महाभारतात दुर्योधनाचा गर्व अखेर त्याच्याच अहंकारामुळे धुळीस मिळाला. साताऱ्याच्या राजकारणातही जयकुमार गोरे यांच्या आक्रमक राजकीय भूमिकेची चर्चा रंगू लागली आहे. मित्रपक्षांशी संघर्ष आणि राजकीय वर्चस्वाची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरणार का? सत्तेचा माज की जनतेचा कौल, याचा फैसला येणारा काळच करेल!

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला