डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या  भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांचा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा सातारा जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात सातारा शहर, रहिमतपूर, कराड आणि पाटण येथे मेळावे होणार असून, महायुतीच्या नेत्यांसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांशी त्या संवाद साधणार आहेत.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्यासह जिल्हा, तालुका आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळ येथे मेळावा होणार आहे. यावेळी आ. मनोज घोरपडे, आ. धैर्यशील कदम, चित्रलेखा माने-कदम, निलेश माने, तेजस्विनी घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जानाई मळाई शिक्षण संस्था कोडोली येथे आ. महेश शिंदे, जि.प.अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, राजू माने यांची त्या भेट घेणार आहेत. रहिमतपूर येथे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते सुनील माने यांचीही त्या भेट घेणार आहेत. सकाळी ११ वाजता जलमंदिर पॅलेस येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, तसेच सुरुचि निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि आ. मनोज घोरपडे यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. 

सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याशीही त्या संवाद साधणार आहेत. तसेच जनता बँक येथेही त्या भेट देणार आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवासस्थानी त्या भेट देणार आहेत. याशिवाय सावकार कॉलेज आणि यशोदा शिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. दुपारी २ वाजता कराड दक्षिणमधील ढेबेवाडी रस्त्यावरील ओम हॉल येथे, तर दुपारी ३ वाजता कृष्णा हॉस्पिटल परिसरातील बॅडमिंटन हॉल येथे मेळावे होणार आहेत. या मेळाव्याला  भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता पाटण येथील काळोलीतील ऋचा मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते ९.३० यावेळेत विधान परिषदेचे आमदार धैर्यशील कदम यांच्या निवासस्थानी त्या भेट देणार आहेत. ९.३० ते ११ यावेळेत सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सातारा जिल्ह्याचा मेळावा होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पदवीधर मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भाजपकडून भर दिला जाणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला