वाईमध्ये ड़ाँक्टर दिन साजरा.
Satara News Team बापू वाघ
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
- बातमी शेयर करा
वाई / डॉक्टर दिनाचे औचित्य साधून वाई येथे नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा संघटनेच्यावतीने वाईतील ग्रामीण रुग्णालयात मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. भीमनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप करण्यात आली.
प्रारंभी निमाचे अध्यक्ष डॉ. शेखर कांबळे यांनी प्रास्ताविक केले व निमा शाखेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. वाई ग्रामीण रुग्णालयाच्या सुप्रिटेंड डॉ योजना तराळ व ग्रामीण रूग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. भीमनगर परिसरातील 45 नागरीकांनी निमा संघटनेच्या या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे व मोफत औषधांचा लाभ घेतला. याप्रसंगी रुग्णांची मोफत हिमोग्लोबीन व शुगर तपासण्यात आली. यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. शेखर कांबळे, उपाध्यक्ष डॉ. सूर्यकांत महांगडे, सचिव डॉ. योगेश फरांदे, कोषाध्यक्ष डॉ. संदेश शिंदे सदस्य डॉ. जाजू, डॉ. भिलारे, डॉ. शीतल लोखंडे, डॉ गजानन गव्हाणे, डॉ. राहुल पोतदार आदींनी रूग्णांची तपासणी केली. चव्हाण लॅबचे श्री. चव्हाण विविध तपासणी चाचण्या केल्या.
निमा संघटनेचे उपाध्यक्ष डॉ सूर्यकांत महांगडे यानी डॉक्टर डे निमित्त उपस्थित सर्व डॉक्टरांना पुष्गुच्छ देऊन शुभेछा दिल्या. डॉ संदेश शिंदे यांनी आभार मानले. उपस्थित रूग्णांनी निमा संघटनेच्या सदस्यांना धन्यवाद दिले.
dr
drday
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Thu 7th Jul 2022 01:51 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Thu 7th Jul 2022 01:51 pm










