जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे शासनाकडून दुर्लक्ष; माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांचा सरकारवर निशाणा

अपशिंगे: राज्यात सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असून वाढती महागाई बेरोजगारी अशा असंख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सरकारमार्फत नवनवीन घोषणा होत असून, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, एकूणच सरकारकडून जनतेच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

ते अपशिंगे तालुका कोरेगाव येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

यावेळी स्थानिक विकास निधीतून मारूती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, जनसुविधा योजनेतून अपशिंगे येथे स्मशानभूमी निवारा शेड बांधणे व सुशोभिकरण करणे, राष्ट्रीय जल पेय योजनेतून अपशिंगे येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे, आमदार स्थानिक विकास निधीतून ग्रामपंचायत मालकीच्या जागेत श्री.खंडोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, डोंगरी विकास निधी योजनेतून अपशिंगे येथे श्री महादेव मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, अर्थसंकल्प मार्च- २०२२ मधून राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा ३३ अ कि.मी.९/५०० ते १२/०० (भाग-एकंबेशिंगे) सुधारणा करणे, लघु पाटबंधारे योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथील पाझर तलाव नं. २ दुरूस्ती करणे, सर्वसाधारण साकव योजनेतून अपशिंगे येथे म्हसोबा जवळच्या ओढ्यावर साकव पूल बांधणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथे बौध्दवस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, २५१५ इतर ग्रामीण विकास योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथे अपशिंगे ते नवलेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, जलजिवन योजनेतून अपशिंगे येथे विहीर दुरूस्ती करणे, नवलेवाडी वसाहतीमधील विहीरीचे खोलीकरण व आर.सी.सी. बांधकाम करणे. यामधील पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन व नव्याने मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षिरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जयवंतराव घोरपडे, कांतीलाल पाटील, संभाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका पालिका, नगरपालिका यांवर प्रशासक आहेत, सरकार निवडणूक घेण्याचे धाडस करत नाही, सरकार कोणत्या मार्गाने आले आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे, निवडणुका घेतल्या तर सरकारला धक्का बसू शकतो या भीतीने निवडणूक घेत नाहीत. मंत्री महोदयांनी त्या त्या विभागाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे, राज्य सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नाही त्यामुळे एका मंत्री महोदयांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे, कोणत्याही विभागाला न्याय मिळत नाही, यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, शहाजीराव क्षिरसागर कांतीलाल पाटील, जितेंद्र भोसले, सरपंच प्रविण भोसले यांनी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन जयहनुमान घाडगे यांनी केले तर आभार रामचंद्र कदम यांनी मांनले.

याप्रसंगी जितेंद्र भोसले, अविनाश माने,  काकासाहेब गायकवाड, दिलीप कदम, विष्णुपंत कणसे, वसंतराव कणसे, यशवंत पवार, जितेंद्र भोसले, भरत गायकवाड, काकासो जगताप, किरण जाधव, राहुल निकम, जयहनुमान घाडगे, शेखर पाटणे, संजय चव्हाण, विजय गायकवाड, ननावरे सर, प्रशांत घाडगे, विष्णू गायकवाड, तुषार जाधव, सौ.साधना चव्हाण, सरपंच प्रवीण भोसले, उपसरपंच नामदेव मोरे, काकासो भोसले, प्रमोद भोसले, शरद भोसले, पी.जी.भोसले, मधुकर कदम, विलास बुधावले, मोहन भोसले, शिवाजी भोसले, बाळकृष्ण भोसले, सोमनाथ वास्के, जयवंत मोरे, राम माने, चांगदेव भोसले, गणेश केसरकर, रामचंद्र कदम, हिम्मत भोसले, मोहन नलवडे, सयाजी बुधावले, तुकाराम बुधावले, दत्तात्रय भोसले, महेश कदम, शुभम भोसले, सागर भोसले, दादा मोरे, सोमनाथ भोसले, महेश भोसले, विजय भोसले, सौ.पुनम भोसले, सौ.नंदिनी केसरकर, सौ कमल काकडे, सौ.लता भोसले, सौ.सविता भोसले, सौ.पौर्णिमा भोसले, सौ.सुजाता भोसले, सौ.रुक्मिणी कदम, सौ.वैशाली पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुहास साखरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विकास चव्हाण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त