परिट समाजाच्या वतीने प्रकाश जाधव (मेहरबान) यांचा सन्मान सोहळा
अशपाक बागवान- Sun 16th Apr 2023 04:54 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : अखिल भारतीय परीट सेवा समाज मंडळाच्या वतीने कराड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव (मेहरबान) यांना नुकताच परिट समाजाचा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे यांच्या हस्ते आज त्यांचा परिट समाजाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रकाश जाधव भावुक झालेले पहायला मिळाले.
यावेळी बोलताना प्रकाश जाधव म्हणाले, परीट समाज बांधव आणि मित्रपरिवाराने केलेला हा माझा सन्मान पाहून मी भारावून गेलो आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून आपणा सर्व समाज बांधवांचा आहे असे मी मानतो. यापुढेही जास्तीत जास्त सामाजिक कार्य करण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरूच राहतील अशी ग्वाही देतो.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बबनराव शिंदे म्हणाले परीट समाजातील प्रकाश जाधव यांच्यासारख्या व्यक्तीने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेतली गेली आहे.आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही परीट समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. संत गाडगेबाबा यांच्या तत्त्वाने त्यांचे कार्य चालूच आहे. ही बाब देखील आदर्शवत आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाश जाधव यांना सन्मानपत्र, संत गाडगेबाबांची मूर्ती, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनील परीट यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत महेश सुळे,अजित गायकवाड, गणेश जाधव यांनी केले. केदार रसाळ यांनी आभार मानले. यावेळी पेरले गावचे आदर्श पोलीस पाटील प्रवीण राक्षे,उत्तम राऊत तांबवे, खंडू इंगळे, दिगंबर यादव, अजित गायकवाड, अण्णा वाघ, अजिंक्य राऊत, दिलीप नलवडे यांच्यासह प्रकाश जाधव यांचा मित्रपरिवार मान्यवर व परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sun 16th Apr 2023 04:54 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sun 16th Apr 2023 04:54 pm










