वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था बुलेट प्रूफ काचपेटी, मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात आज दुपारी विशेष सुरक्षेत दाखल झाली. ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी, तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत, तसेच पोलिस व बाहेरच्या एजन्सीकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही वाघनखे सात महिने सातारकरांना पाहता येणार आहेत.

शुक्रवारी (ता. १९) दुपारी सव्वाबाराला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत.

ही वाघनखे आज (बुधवारी) सकाळी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली व तेथून सातारा पोलिस व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुपारी साताऱ्यात आणण्यात आली. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. तब्बल सात महिने ही वाघनखे येथे लोकांना पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी ती बुलेट प्रूफ काचेच्या पेटीत ठेवण्यात येणार असून, त्यांच्या सुरक्षिततेचा काळजी घेण्यात आली आहे. इंग्लंडहून विशेष विमानाने वाघनखे महाराष्ट्रात आली. तेथून ती विशेष सुरक्षेत साताऱ्यात दाखल झाली.

शुक्रवारी होणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभास खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियमच लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील सोबत असतील. या वाघनाखांसोबत ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअर टेकर आला असून, तो वाघनखांची सर्व ती काळजी घेणार आहे. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये बुलेट प्रूफ काचपेटी, मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर यासोबतच मॅन्युअल सुरक्षा यंत्रणाही तैनात असेल.

सुरक्षिततेच्या कारणास्तव या वाघनखांची मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या वाघनखांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सुरुवातीला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम सुरू होईल. दुपारी सव्वाबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संग्रहालयात कार्यक्रम होईल. यावेळी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष टपाल तिकिटांचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त