सातारा पोलिसांचे जिल्ह्यात 42 ठिकाणी ऑल आउट ऑपरेशन करून 228 केसेस करून एक लाख 7600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सातारा : कायदा सुव्यवस्थेची निगराणी आणि सतर्कता या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशानुसार सातारा पोलिसांनी जिल्ह्यात 42 ठिकाणी ऑपरेशन ऑल आउट राबवले. जिल्ह्यामध्ये सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधून जिल्ह्याच्या हद्दींची नाकाबंदी करण्यात आली आणि विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या ऑपरेशन मध्ये 50 पोलीस अधिकारी आणि 237 पोलीस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये 228 केसेस करून एक लाख 7600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान बेकायदा दारू विक्रीच्या 22 केसेस करून 19 हजार 70 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वडूज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी या ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पकडण्यात आला असून एकूण 51 अजामीन पात्र वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. सातारा पोलिसांनी या ऑल आऊट ऑपरेशन मध्ये 395 हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस यांची तपासणी केली. एकूण 151 पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले आहेत.

यापुढे सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे मालमत्तेच्या गुन्ह्यावर प्रतिबंध आणण्याकरता सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने ऑल आऊट ऑपरेशन ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त