पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई

महाबळेश्वर :महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कृतीशील नेतृत्वाची झलक दाखवत शहरातील वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू असलेल्या वेण्णा लेक परिसरात प्रत्यक्ष जाऊन वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळली.

पर्यटन हंगामामुळे वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे प्रकार नेहमीच घडतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन निरीक्षक गालिंदे यांनी कार्यालयात बसून केवळ सूचना देण्याऐवजी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांसह नियोजन केले. वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करत वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

महाबळेश्वर–पाचगणी हे राज्यातील तसेच देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने वाहतूक व्यवस्थापन हे पोलीस प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पदभार स्वीकारताच प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक आणि कृतीशील दृष्टिकोन असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

वेण्णा लेक परिसरातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांनाही दिलासा मिळाला. अनेकांनी नव्या प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या या तात्काळ कृतीचे स्वागत करत, वाहतूक शिस्तीसह पर्यटनस्थळावरील इतर समस्यांवरही अशाच प्रकारे प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पर्यटनस्थळाची वाढती गर्दी, पार्किंगची कमतरता आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने सातत्याने प्रत्यक्ष मैदानात राहून नियोजन केल्यास महाबळेश्वरमधील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला