फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
गुटख्याची दुकाने बंद पण गुटखा डिलिव्हरी बॉय सेवेत.Satara News Team
- Wed 17th Jun 2026 10:30 am
- बातमी शेयर करा
फलटण. संपूर्ण महाराष्ट्र राज्य वर अन्न व औषध प्रशासन राज्याचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांनी जोरदार मोहीम चालू केली असून सातारा जिल्ह्यात मात्र लुटुपुटूच्या कारवाई ची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.
फलटण शहरात राजरोसपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय करताना सर्वांनाच दिसून येत आहेत.
परंतु अन्न व औषध विभाग सातारा यांना मात्र फलटणचा रस्ताच माहीत नसल्याप्रमाणे गुटख्यावर मात्र नागरिकांनी प्रसार माध्यमाद्वारे संबंधित प्रशासनाकडे वारंवार निदर्शनास आणून देऊन सुद्धा या गुटखा बहादा रांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे कागदाच्या लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या ओझा खाली कारवाई करणाऱ्यांचे हात अडकले आहेत का? असा संतप्त सवाल फलटण तालुक्यातील नागरिक करत आहेत. हातबल झालेले पालक गुटक्याच्या व्यसनात अडकलेली तरुण पिढी आता गुटख्यावर कारवाई निश्चित होणार अशी वेडी आशा बाळगून फलटणमध्ये अन्न औषध विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा करताना चे चित्र दिसत आहे.
बहुसंख्य तरुण पिढी गुटक्याच्या व्यसनाधीन झालेली घरोघरी आढळून येत आहे.
मात्र आज पर्यंत तरी अन्न व औषध विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेऊन कारवाई न केल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यातच व्यसनाचा आलेला नवीन प्रकार म्हणजे केमिकल युक्त गोळ्या सहजपणे फलटण शहरातल्या काही दुकानात उपलब्ध असल्यामुळे तरुण पिढी या केमिकलच्या व्यसनात पण अडकून शहरांमध्ये नको ते वेगवेगळे दुष्कृत्य करून व्यवसायिकांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे याबाबत सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी व्यसनमुक्ती चे कार्य करणाऱ्या एका पत्रकारांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात फलटणच्या तरुण पिढी बाबत चिंता व्यक्त करताना आपले विचार नुकतेच प्रदर्शित केले होते. मागील काही दिवसापासून राज्याचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर धडक कारवाई चालू केल्यामुळे फलटणच्या जनतेच्या आशा वाढलेल्या होत्या.
परराज्यातून आलेल्या एका लुंगीवाल्या गुटखा तस्कराने शहरात व तालुक्यातआपले गुटखा विक्रीच्या व्यवसायाचे ब स्थान बसवुन बक्कळ लक्ष्मी प्राप्त केली. काही उच्चवर्णीय सज्जन पणाचा आव आणणाऱ्या आणि आम्ही समाजाला चांगली शिकवण देतो असे चित्र निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या दुकानदारांच्याकडे अवैधरित्या एजन्सी देऊन गुटखा विक्रीस प्रोत्साहित केले आणि फलटणची तरुण पिढी मात्र या गुटख्या च्या विळख्यात अडकून व्यसनाधीन झाली त्यामुळे पालक वर्ग ही हातबल झाला. मागील वर्षी तर अंध निधीसाठी मदत गोळा करणारे विद्यार्थी चक्क गुटखा खाऊन अंधनिधी गोळा करत होते त्याची चित्रफित फलटण शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित करून वस्तूस्थिती जनतेच्या समोर आणि प्रशासनासमोर आणून दिली होती तरीसुद्धा प्रशासनाने या गुटखा विक्रीवर कोणतेही निर्बंध न घालता राजरोसपणे गुटखा विक्री आज पर्यंत तरी चालूच ठेवली आहे.
आता गुटख्या ची दुकाने बंद झाली पण गुटख्याची विक्री मात्र डिलिव्हरी बॉय च्या खिशातून फलटणमध्ये चालूच आहे असे गुटखा चघळणाऱ्या लोकांना गुटखा मिळत असल्यामुळे दिसून येत आहे.
दुकान बंद झाले तरी चढ्या दराने गुटखा विक्री मात्र होताना फलटण शहरात अजून तरी दिसून येत आहे. यामुळे अन्न औषध विभाग सातारा यांना फलटणचा रस्ता माहित नाही का? का वाजंत्री घेऊन सातारला येऊन अधिकाऱ्यांना घेऊन यावे लागेल अशी संतप्त भावना हतबल झालेले पालक वर्ग करत आहेत.
खाद्यपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ याबाबतच्या कारवाईबाबत पण अजून कोणतीच माहिती फलटणकर नागरिकांना आढळून येत नाही त्यामुळे फलटण शहरात बहुतेक सर्व खाद्यपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ खरोखरच प्रमाणित नियमानुसार योग्य आहेत म्हणून विक्री केली जात आहे का याबाबत ही माहिती मिळावी अशी माफक अपेक्षा नागरिक त्यांना मिळालेल्या संविधानाच्या हक्काने प्रशासनाकडे करत आहेत पण प्रशासनाचे डोळे दिसत असून आंधळे आहेत का की प्रशासनाच्या डोळ्याला सर्वकाही योग्य वाटत आहे अशी धारणा आता जनतेतून होऊ लागली आहे.
कागदी लक्ष्मीच्या ओझ्याखाली आलेले हात झटकून जनतेला सामाजिक आणि नैसर्गिक न्याय मिळण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा मात्र फलटणकर नागरिक नक्कीच करत आहेत यात काहीही शंका नाही.
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Wed 17th Jun 2026 10:30 am
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 17th Jun 2026 10:30 am
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Wed 17th Jun 2026 10:30 am
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Wed 17th Jun 2026 10:30 am
संबंधित बातम्या
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Wed 17th Jun 2026 10:30 am
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Wed 17th Jun 2026 10:30 am
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 17th Jun 2026 10:30 am
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Wed 17th Jun 2026 10:30 am
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 17th Jun 2026 10:30 am
-
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Wed 17th Jun 2026 10:30 am
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Wed 17th Jun 2026 10:30 am
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Wed 17th Jun 2026 10:30 am













