खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
रस्ता मागणी अर्ज विहीत नमुन्यात नाही सांगण्यासाठी २६३ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो?आशपाक बागवान
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : थोरवेवाडी पाझरतलाव च्या बंधाऱ्यावरून गेल्यानंतर पश्चिमेला असलेल्या गट नंबर ३३८ या शेतजमीन आणि त्यामधील विहिरीवर जाण्यासाठी सदरच्या शेताच्या पुर्वेस असलेल्या गट नंबर ३४० आणि ३४३ च्या मालकाने लगत असलेल्या पाझरतलाव मधील गाळपेर चा हक्क अबाधित असलेले शेतकरी अथवा प्रशासन यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुमारे २५० ब्रास गाळ उपसून पुर्वंपार वापरात असलेल्या रस्त्यासह लगतच्या गटांमध्ये ती भरून कायमस्वरूपी रस्ता बंद केला असल्याची माहिती संबंधित पिडित शेतकऱ्याने खटाव (वडूज) चे विद्यमान तहसीलदार बाई सर्जेराव माने यांना फोन करून तसेच व्हाट्सअप या सोशल मिडिया वरून दिली होती. त्यानंतर संबंधित कर्तव्यदक्ष गावकामगार तलाठी संदिप काटकर यांनी वरिष्ठ (तहसिलदार) यांचे सांगणे वरून समक्ष भेट देऊन पंचनामा करत वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असल्याचे समजते परंतू कारवाई मात्र शुन्यच. त्यानंतर गट नंबर ३३८ मध्ये शेतकऱ्याचे वाहन जाणे करीता दुसरी वाट नसलेने दिनांक ०७/१०/२०२५ रोजी मा. तहसीलदार यांचे कार्यालयात महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये कायमस्वरूपी रस्ता मिळणे कामी अर्ज दाखल केला. त्यामध्ये लगतदाराचे उताऱ्यांसह आवश्यक सर्व कागदोपत्री पुरावे सादर केले.
बऱ्याच वेळा संबंधित कार्यालयाच्या बारनिशी मध्ये संपर्क साधल्यानंतर तक्रारी चा ऑनलाईन नंबर E-6175309 हा नंबर देण्यात आला. त्यासोबतच सदरचा अर्ज पुढील कारवाई करिता कुळकायदा आणि रस्ते केस टेबल असलेल्या मा. शरद सानप साहेबांकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित अधिकारी यांना वारंवार समक्ष भेटून आणि दुरध्वनी द्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतू माहीती मिळाली नाही.
दिनांक १८ जून २०२६ रोजी संबंधित टेबल चे सर्वेसर्वा मा.शरद सानप यांची समक्ष भेट घेत जाब विचारला असता "तुमचा अर्ज विहित नमुन्यात नसल्याने अर्ज निकाली काढण्यात आला" असे सांगितले. परंतू संबंधित अर्जदारास कळविल्याबाबत कोणत्याही प्रकारची पोहोच संबंधित कर्मचारी यांचेकडे आढळून आली नाही. त्यानंतर संबंधित मा.गाव कामगार तलाठी संदिप काटकर यांनी
दिनांक २३/०६/२०२६ रोजी अर्जदारास व्हाट्सअप द्वारे सदरचा अर्ज निकाली काढल्याबाबत चे पत्र पाठवले. ते वाचल्यानंतर संबंधित टेबल चे कर्मचारीच नव्हे तर संबंधित कार्यालयाचे प्रमुख तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांचे देखील डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला.
अर्ज थोरवेवाडी (पुसेसावळी) येथील शेतकऱ्यांने केला होता तर निकाली काढलेला अर्जावरील शेतकऱ्याचे नाव आणि उल्लेखीत गट नंबर ही बरोबर होते. परंतू गांव मात्र मौजे चितळी असे करण्यात आले होते. तसेच त्यावर संबंधित तहसीलदार यांची डिजिटल स्वाक्षरी दिनांक १०/१२/२०२५ वेळ १२:३८:२१ अशी दिसून येत आहे. यावरून तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संबंधित अधिकारी यांनी प्रिंटींग मिस्टेक कारण दिल्यास नवल वाटायला नको. मग प्रश्न हा आहे की मालक असलेल्या जनतेकडून विहित नमुन्यातील अर्जाची अपेक्षा बाळगणारे लोकसेवक (पगारी नोकर) असलेले तहसिलदार तक्रारी आणि त्यावर त्यावर तयार करण्यात आलेले कागदोपत्री उत्तर नेमके कोणत्या धुंदीत स्वाक्षरी करतात आणि त्यांच्या वर्चस्वात कार्यरत असलेले अधिकारी कोणत्या नशेत अर्ज निकाली काढतात?
हे एक प्रकरण नसून सखोल चौकशी केल्यास ढिगभर अशी प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालक असलेल्या जनतेच्या सेवेसाठी आपली त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे याचा विसर पडू न देता तहसिदारांसह अशा फुकटचा पगार घेत खुर्च्या तापविणाऱ्या पगारी नोकर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला जमत नसेल तर सदरच्या खुर्च्या तातडीने सोडाव्यात आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना मालक असलेल्या जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी खटाव तालुक्यातील जनतेकडून होत आहे.
स्थानिक बातम्या
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
संबंधित बातम्या
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
-
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Sun 28th Jun 2026 03:40 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Sun 28th Jun 2026 03:40 pm












