स्त्रीने स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे - डाॅ.सौ.संगिता येळवे
प्रकाश शिंदे - Thu 15th Dec 2022 12:39 pm
- बातमी शेयर करा
डाकेवाडी: स्त्रीने स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे, आपल्यामध्ये असणारे गुण ओळखून प्रगती साधली पाहिजे असे मत सुप्रसिध्द कवियित्री डाॅ.सौ.संगिता येळवे यांनी व्यक्त केले. त्या डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळयानिमित्त आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ग्रा.पं.सदस्या सौ.माया साळुंखे, अंगणवाडी मदतनीस मीना डाकवे, अनुसया डाकवे, ह.भ.प.नामदेव डाकवे, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल डाकवे, वसंत डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौ.येळवे पुढे बोलताना म्हणाल्या, ‘‘हळदी कुंकू समारंभामधून विचारांची देवाण घेवाण होते, डाकेवाडीच्या मंडळाने हा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये आपुलकी, प्रेम जिव्हाळा आहे. येणाऱ्या भावी पिढीने तो जपून ठेवायला हवा.’’
अनिल डाकवे म्हणाले, श्री दत्त मंदिर जीर्णोध्दारासाठी गावातील लोकांनी केलेले श्रमदान कौतुकास्पद आहे. लोकांनी मंदिरासाठी दिलेला वेळ अभिमानास्पद आहे. गावातील सामाजिक आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ह.भ.प.नामदेव डाकवे म्हणाले, डाकेवाडी गावाला अध्यात्माचा वारसा आहे. आज आपल्या पारायण सोहळयाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये गावातील लोकांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. दरम्यान, व्यासपीठचालक ह.भ.प.नामदेव डाकवे तसेच पाटण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी अनिल डाकवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सौ.संगिता येळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
ह.भ.प.वसंत डाकवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि हार देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार आणि सुत्रसंचालन डाॅ.संदीप डाकवे यांनी केले. कार्यक्रमास डाकेवाडीतील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्रिमुर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ डाकेवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी (काळगांव) यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 15th Dec 2022 12:39 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 15th Dec 2022 12:39 pm













