फलटण मधून दिपकराव चव्हाण यांनी चौथ्यांदा भरला उमेदवारी अर्ज
Satara News Team
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्ष महाविकास आघाडी कडून फलटण कोरेगाव चे मागील तीन टर्म आमदार असलेले दिपकराव चव्हाण यांनी आज शक्ती प्रदर्शन करीत तुतारी व हलगीच्या निनादात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सुपूर्त केला दुपारी ३ वाजता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला याआधी त्यांनी फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षातून महाविकास आघाडी कडून यावेळी आपण आमदार दीपक राव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज भरला असून सलग तीन टर्म त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केलेली विकास कामे विधानभवनात त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न व फलटण तालुक्यावर राष्ट्रवादी राजे गटाचे असलेले वर्चस्व याला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट,राष्ट्रीय काँग्रेस,आप या पक्षांची सुद्धा साथ मिळाली असल्याने आमदार दीपकराव चव्हाण हे चौथ्यांदा विधान सभेवर निवडून जातील यात शंका नाही आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले, पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मी केलेली विविध विकास कामे व मागील ३० ते ३५ वर्षापासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्रिपद व सभापती काळात गेलेली विविध विकासकामे व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांनी केलेली कामे जोरावर मायबाप जनता मला चौथ्यांदा विधानसभेवर निवडून पाठविल यात शंका नाही
समोरचा उमेदवार अजून कुठून लढणार हे निश्चित नसले तरी समोरचा उमेदवार अजित पवार गट किंवा भाजपमधून लढला तरी याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महेंद्र बेडके सूर्यवंशी यांनी सर्वजण एकत्रित काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्रित लढत असल्याने गत वेळी पेक्षा आमदार दीपकराव चव्हाण यांचा विजय यावेळी अधिक मताधिकांनी होईल असे सांगितले अर्ज भरतेवेळी राष्ट्रवादी राजे गट राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा व आप पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

स्थानिक बातम्या
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
संबंधित बातम्या
-
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
-
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 25th Oct 2024 05:04 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 25th Oct 2024 05:04 pm











