मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?

लॉगिन अधिकार नसलेल्या महेश घुटुगडे यांना वाहतूक पोलिसांची वर्दी व ई-चलान मशीन कशी मिळाली?

सातारा न्यूज : आशपाक बागवान.

शामगाव घाटातील मसूर फाट्यावरील ई-चलान मशीनच्या वापराबाबत माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तराने नियुक्ती आणि अधिकारांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या आदेशात महेश घुटुगडे यांना वाहतूक पोलीस म्हणून नियुक्त न करण्यासोबतच ई-चालाण मशिन ताब्यात न देण्याचा उल्लेख असल्याचा दावा आणि माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात ई-चलान लॉगिन अधिकार असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महेश घुटुगडे याचे नाव नसल्याने उपलब्ध माहिती पेक्षाही सखोल तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.


            वाहतूक पोलिस म्हणून कर्तव्य आणि ई-चलान मशीनचे अधिकृत लॉगिन अधिकार नसल्याचा दावा असलेल्या महेश घुटुगडे यांना मसूर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वाहतूक पोलिसांची वर्दी आणि ई-चलान मशीन दिली असल्यास, नेमकी कोणती ‘इमर्जन्सी पॉवर’ वापरली? त्यामागे कोणता अधिकृत आदेश किंवा आपत्कालीन अधिकार वापरण्यात आला? संबंधित नियुक्तीला वरिष्ठांची मंजुरी होती का, हा कळीचा प्रश्न आहे.


        माहिती अधिकाराच्या उत्तरानुसार, मसूर पोलीस ठाण्यासाठी एका ई-चलान मशीनचा आणि दोन पोलीस अंमलदारांच्या लॉगिन अधिकारांचा उल्लेख आहे. मग संबंधित कालावधीत या अधिकृत लॉगिन धारकांना हजेरी मेजर किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अन्य कोणत्या कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले होते? त्यांचे ड्युटी आदेश आणि हजेरी नोंदी काय सांगतात, याची चौकशी होणे आवश्यक आहे.


       तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या आदेशात संबंधित कर्मचाऱ्याला वाहतूक पोलीस म्हणून नियुक्त न करण्याचे आणि ई-चालाण मशिन ताब्यात न देण्याचे स्पष्ट निर्देश असूनही पोलिस ठाण्याचे कारभाऱ्यां कडून त्याला त्या स्वरूपाचे कर्तव्य व ई-चलान मशीन देण्यात आली असेल, तर ही बाब गंभीर ठरू शकते. त्यामुळे संबंधित आदेश, नियुक्ती नोंदी, मशीन हस्तांतरण आणि लॉगिन तपशीलांची चौकशी करून तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने विद्यमान पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेणार? याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

*क्रमशः...भाग ३.*

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?

मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला