खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

नवरात्र... नऊ रात्रींचा शक्तीचा जागर! या नऊ दिवसांत आपण आदिमाया पार्वतीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करतो. ती कधी विद्या देणारी सरस्वती होते, कधी धन-धान्य देणारी लक्ष्मी होते, तर कधी दुष्टांचे निर्दालन करणारी महाकाली, दुर्गा बनते. आपण त्या मूर्तींना मंदिरात शोधतो. पण मला सांगा, आजच्या या कलियुगात, जेव्हा स्त्रीच्या अब्रूवर घाला घातला जातो, जेव्हा समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा आपल्या रक्षणासाठी रणांगणावर कोण उभे असते? तीच दुर्गा... तीच काली... पण हातात त्रिशूळ घेऊन नाही, तर हातात कायद्याचा डंडा घेऊन, अंगावर खाकी वर्दी परिधान करून!

महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात अशाच एका जिवंत दुर्गेची, एका रणरागिणीची नोंद आज सुवर्ण अक्षरांनी होत आहे. त्या आहेत, नानवीज (ता. दौंड, जि. पुणे) येथील राज्य राखीव पोलीस बल  प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, सन्माननीय जयश्री देसाई मॅडम.

जयश्री देसाई यांच्या कार्याची, त्यांच्या कणखरतेची मूळं साताऱ्याच्या पवित्र मातीत घट्ट रुजलेली आहेत. सातारा..छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी! ज्या भूमीने महाराष्ट्राला अनेक शूरवीर, अनेक क्रांतिकारक दिले, त्याच भूमीची ही सुकन्या. लहानपणापासूनच त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न होतं. फक्त स्वतःसाठी जगायचं नाही, तर या समाजाचे, या मातीचे आपण काहीतरी देणे लागतो,हाच भाव मनात ठेवून 

मग सुरु झाला संघर्षाचा, जिद्दीचा प्रवास. स्पर्धा परीक्षेचा तो खडतर मार्ग... जिथे हजारो विद्यार्थी घाम गाळतात, रात्रंदिवस अभ्यास करतात. त्या गर्दीतून आपली वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नव्हतं. पण म्हणतात ना, "जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या संगमावर यशाचा महामेरू उभा राहतो." तोच महामेरू जयश्री मॅडमनी उभा केला.

सन २०११... तो ऐतिहासिक क्षण जेव्हा साताऱ्याच्या लेकीने राज्य गाजवले!

सन २०११ हे वर्ष महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या इतिहासात आणि देसाई कुटुंबाच्या जीवनात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतलेल्या पोलीस उप-अधीक्षक (DySP) पदाच्या अत्यंत कठीण अशा परीक्षेत, संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जयश्री देसाई यांनी घवघवीत यश संपादन केले.

हे यश केवळ एका परीक्षेतील यश नव्हते. हे यश होते  एका मुलीच्या अफाट मेहनतीचे, तिच्या आई-वडिलांच्या संस्कारांचे, आणि "मी करू शकते" या आत्मविश्वासाचे. त्या दिवशी प्रत्येक लेकीच्या डोळ्यात एक नवी आशा निर्माण झाली होती, की आपणही हे करू शकतो.

कर्तव्याचा अखंड आलेख - रत्नागिरीच्या सागर किनाऱ्यापासून नानवीजच्या रणांगणापर्यंत

पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचा प्रत्येक दिवस हा जनसेवेचा, कर्तव्याचा होता.

१. रत्नागिरी - सेवेचा पहिला अध्याय: परिविक्षाधीन पोलीस उप-अधीक्षक म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. हा काळ होता परीक्षेचा. एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट, तर दुसरीकडे तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा. अशा दुहेरी संकटातही त्यांनी ज्या धीराने, ज्या नियोजनाने काम केले, ते आजही रत्नागिरीकरांच्या स्मरणात आहे. गरजूंना मदत पोहोचवणे असो, की वादळग्रस्तांना आधार देणे असो, त्या नेहमीच आघाडीवर होत्या.

२. प्रशासकीय कसब - पारदर्शकतेचा आदर्श: त्यानंतर गंगापूर (छत्रपती संभाजीनगर), जुन्नर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून, तसेच सातारा येथील जात पडताळणी समितीवर अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात त्यांनी दाखवलेली पारदर्शकता, निर्णयातील स्पष्टता ही आजही एक आदर्श म्हणून पाहिली जाते.

३. भावी अधिकाऱ्यांच्या शिल्पकार - MPA नाशिक: एक चांगला अधिकारी होण्यापेक्षा, चांगले अधिकारी घडवणे हे अधिक कठीण काम असते. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी (MPA) येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी हीच भूमिका अत्यंत लीलया पार पाडली. नवप्रविष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केवळ कायद्याचे ज्ञानच नाही, तर माणुसकीचा पाठही त्यांनी शिकवला.

४. अपर अधीक्षक म्हणून दरारा: रत्नागिरी आणि कोल्हापूर परिक्षेत्रात अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांच्या कामाचा दरारा गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला होता. एखादी गंभीर घटना घडली, की त्या स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करायच्या, पुराव्यांची शहानिशा करायच्या. त्यामुळे तपासाला गती मिळायची आणि सामान्य माणसाला न्याय मिळायचा. वाहतूक नियोजन असो, सण- उत्सवाचा बंदोबस्त असो, किंवा राजकीय नेत्यांचे दौरे असो, त्यांचे नियोजन हे नेहमीच वाखाणण्याजोगे असायचे.

खाकी वर्दीतील एक संवेदनशील मन - हिरकणीचा खरा अलंकार

बाहेरून कडक शिस्तीची वाटणारी ही खाकी वर्दी, आतून किती हळवी असू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयश्री देसाई.

"साधी राहणी, उच्च विचारसरणी" हे ब्रीदवाक्य त्यांनी आपल्या जीवनात अंगीकारले आहे. त्यांच्या कार्यालयाचे दार सर्वसामान्यांसाठी नेहमी उघडे असते. एखादी महिला तक्रार घेऊन आली, तर त्या तिचे म्हणणे आईच्या मायेने ऐकून घेतात. केवळ कायद्याच्या कलमात न अडकता, समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक मोडकळीस आलेली कुटुंबे त्यांनी पुन्हा जोडली आहेत. कोल्हापूरमध्ये असताना महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांनी निर्भया पथकाला अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनवले. रस्त्यावर छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर त्यांनी अशी जरब बसवली की, पुन्हा कोणी मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही.

आज त्या नानवीज येथे SRPF च्या ७८४ प्रशिक्षणार्थी जवानांना आणि ५७ जिल्हा कवायत निदेशकांना (DID) प्रशिक्षण देत आहेत. उद्याचे हे जवान जेव्हा देशसेवेसाठी मैदानात उतरतील, तेव्हा त्यांच्या मनात जयश्री मॅडमनी दिलेले शिस्तीचे, देशभक्तीचे आणि माणुसकीचे धडे असतील.

एका नव्या पर्वाची सुरुवात

जयश्री देसाई म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहतात, पण त्यांचे कार्य सिद्ध आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, प्रचंड ताण-तणाव असलेल्या पोलीस खात्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, किंबहुना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून काम करणे, हे खरोखरच शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे...

या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला