मद्य पिऊन दोन मित्रांत भांडण दोघेही खोल एकीव दरीत कोसळले..दरीत पडलेले युवक एक बसाप्पाचीवाडी व एक सातारा करंजे येथील
Satara News Team
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जावली तालुक्यातील एकीव धबधब्यात सायंकाळी सहाच्या सुमारास दोघेजण पडले असून त्यातील एकजण सुखरूप असल्याची तर एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून दरीत पडलेले युवकांना काढण्यासाठी ट्रेकर्सची टीम बोलवण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी चार युवक आले होते मद्य पिऊन त्यांच्यात भांडणे झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. भांडणामधेच मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला भांडण करत गेले असता दोघेजण खोल दरीत कोसळले. रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस व अवघड जागा यामुळे घटनास्थळी पोहचण्यास अडचणी येत आहेत.जखमींपैकी त्यातील एकाशी संपर्क होत असून दुसरा गंभीर जखमी असल्याचे समजते आहे. घटनास्थळी मेढा पोलीस पोचले असून दरीत पडलेल्या युवकांना काढण्यासाठी ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले आहे अंधार आणि पावसामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत.
एकीव धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी शनिवार रविवार पोलीस बंदोबस्त ठेवावा अशा आशयाची बातमी मागच्याच आठवड्यात दैनिक सातारा न्यूज व जय महाराष्ट्र न्यूज यांनी प्रसिद्ध केली होती. पोलीस प्रशासनाने त्या बातमीची दखल घेऊन शनिवार व रविवार पोलीस बंदोबस्त ठेवला असता तर ही दुर्घटना टाळता आली असती. दरीत पडलेले युवक एक बसाप्पाचीवाडी व एक सातारा करंजे येथील असल्याची माहिती समोर येत आहे
सातारा न्यूजने ठोस भूमिका मांडली होती , पोलीस प्रशासनाने योग्यतेवेळी निर्णय घेतला असता तर हा अपघात घडला नसता असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
संबंधित बातम्या
-
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
-
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sun 16th Jul 2023 10:22 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sun 16th Jul 2023 10:22 pm











