नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
वनविभागाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाटSatara News Team
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
- बातमी शेयर करा
शिवथर : सातारा तालुक्यातील नहाळेवाडी येथे शनिवारी (दि. ३) सायंकाळी घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या हल्ल्यात जय संदीप खंडागळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नहाळेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सायंकाळच्या सुमारास परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अंधाराचा फायदा घेत घरासमोर खेळत असलेल्या जय याच्यावर बिबट्याने झडप घातली आणि त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. घरातील व्यक्तींनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने बालकाला तेथेच सोडून दिले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी सांगितले.
घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी जखमी बालकाला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने खंडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण नहाळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शिवथर परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी परिसरात काही युवकांना बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. तसेच परिसरात आढळलेल्या ठशांबाबतही ग्रामस्थांनी बिबट्याची शक्यता व्यक्त केली होती.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, बिबट्याचा वावर असल्याची माहिती देऊनही वनविभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नाही. परिसरात पिंजरा लावणे, गस्त वाढवणे किंवा नागरिकांना आवश्यक सूचना देणे याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटनेनंतर वनविभागाने परिसरात उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी पिंजरा लावण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातारा जिल्हा वनअधीक्षक अमोल सातपुते यांच्याशी संपर्क साधून संबंधित जागेचा पंचनामा तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या घटनेमुळे सातारा तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटना घडल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये पूर्वसूचना देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
जय संदीप खंडागळे या अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला मृत्यू हा कुटुंबासाठी कधीही न भरून येणारा आघात असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक बातम्या
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 3rd Oct 2026 10:29 pm












