बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

सातारा  : मालगाव-न्हाळेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वनविभागाच्या उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने आवश्यक ती खबरदारी आणि प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, त्यामध्ये हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

या घटनेची निष्पक्ष चौकशी करून वनविभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोष आढळल्यास त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

तसेच परिसरातील बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि मृत बालकाच्या कुटुंबाला शासनाने तातडीने योग्य ती आर्थिक मदत द्यावी.

बालकाचा मृत्यू ही केवळ दुःखद घटना नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तातडीने ठोस कार्यवाही करावी. यामध्ये वन विभागाला कल्पना देऊन पण दुर्लक्ष केल्याने बाळाचा  बळी गेला असल्याने जबाबदार वनविभाग आहे

रयत क्रांती संघटना सातारा युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे सोनू

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला