देशात गेल्या २४ तासात 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू
दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारीSatara News Team
- Tue 28th Jun 2022 08:03 am
- बातमी शेयर करा
राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले
सातारा न्यूज : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात देशात 9923 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात दिल्लीसह महाराष्ट्रात रूग्णवाढ होताना दिसत आहे.
दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 700 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 27 रुग्णांच्या मृत्यूनंतर देशातील एकूण कोरना मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 47 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमणांपैकी सक्रिय रुग्ण 0.21 टक्के आहेत. राष्ट्रीय कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.58 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रात सोमवारी 2369 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकूण 1402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1062 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत पाच कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.
corona
Corona'sShirkawan
india
स्थानिक बातम्या
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Tue 28th Jun 2022 08:03 am
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Tue 28th Jun 2022 08:03 am
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Tue 28th Jun 2022 08:03 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Tue 28th Jun 2022 08:03 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Tue 28th Jun 2022 08:03 am
संबंधित बातम्या
-
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
वडिलांची साद, त्याला नीलमचा प्रतिसाद
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
मोठी बातमी; सर्व विवाहित आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
पाकिस्तानात टोमॅटो 500 रुपये किलो आणि कांदा 400 रुपये किलो
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
मणिपूरमध्ये भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त
- Tue 28th Jun 2022 08:03 am










