मणिपूरमध्ये भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त

अनेक जवान बेपत्ता, दोन मृतदेह सापडले
दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मणिपूरमधील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भूस्खलन घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे.

सातारा न्यूज इम्फाळ : मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये  भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यात घटनेत लष्कराचा एक कॅम्प  मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तुपुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिरीबामला इम्फाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार करण्यात येत होता, ज्याच्या संरक्षणासाठी 107 टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात पाऊत झाल्याने अचानक भूस्खलन  झाले. ज्यात अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त