350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सातारकरांना अनुभवता येणार 'जाणता राजा’ महानाट्य
Satara News Team
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
- बातमी शेयर करा
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत "जाणता राजा" या महानाट्याचे प्रयोग दि. 22, 23 व 24 फेब्रुवारी, 2024 सलग तीन दिवस सायंकाळी 6:00 ते 9:30 या वेळेत जिल्हा परिषद मैदान सातारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे. "जाणता राजा" हे महानाट्य पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. महानाट्य पाहण्यासाठी विनाशुल्क प्रवेश पासची व्यवस्था केलेली असून सदर पासेस जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका कार्यालय येथून उपलब्ध करुन घेता येतील. सदर पासेस दाखवल्यानंतरच महानाट्य पाहण्यासाठी प्रवेश दिला जाईल.
महानाट्य पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सैनिक स्कूल, सातारा यांचे मैदानावर वाहनतळाची सोय करणेत आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. कार्यक्रमाची सुरवात आरतीने होणार असून त्यानंतर "जाणता राजा" या महानाट्याचा प्रयोग सुरु केला जाईल. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी "जाणता राजा" या महानाट्याचा आस्वाद घेणेकरीता मोठ्या संख्येने उपस्थित राहणेबाबत मा.श्री. जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी सातारा यांनी आवाहन केले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 21st Feb 2024 01:17 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 21st Feb 2024 01:17 pm










