फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
राजेंद्र बोन्द्रे
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
- बातमी शेयर करा
फलटण. : आज विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी आज सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गाची तसेच पालखी तळांची आणि पालखीच्या विसाव्यांची पाहणी करून सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी पुढे रवाना झाल्या.
या दौऱ्यात त्यांच्या समवेत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील. जिल्हा परिषद साताराच्या सीईओ याशनी नागराजन, प्रांत अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजीत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल खांबे, वीज वितरण विभागाच्या अधिकारी तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री समशेर सिंह नाईक निंबाळकर उपनगराध्यक्षा सौ भोसले पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांनी दुपारच्या वेडी इरिगेशन विभागाच्या रेस्ट हाऊस येथे जाऊन स्वागत केले. नगराध्यक्ष समशेर सिंह यांनी फलटण येथे पालखी सोहळा मुक्कामी असताना वारकरी माऊली भक्तांना फलटण नगर परिषदेच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही असे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने निदर्शनास आणून दिले. दरवर्षी माऊली संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वस्तांच्या समवेत विभागीय आयुक्त फलटण येथील असणाऱ्या पालखीतळावर भेट देऊन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांच्या सोयी सुविधा बाबत माहिती घेत असतात. परंतु यावर्षी विभागीय आयुक्तांनी पालखीतळावर भेट न देताच पंढरीचा मार्ग स्वीकारला याबाबत मात्र फलटण येथील भाविक भक्तांच्या आणि नागरिकांच्या मध्ये चर्चेचा विषय झाला आहे. इतर सर्व पालखीतळावर भेट देऊन तसेच छोट्या विसाव्याच्या ठिकाणीही भेट देऊन विभागीय आयुक्तांनी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली परंतु फलटणच्या पालखीतळावर न येताच पंढरीच्या दिशेने विभागीय आयुक्तांची पावले वळाल्यामुळे याचे कारण काय असू शकते अशी उलट सुलट चर्चा मात्र भाविक भक्तांच्या समूहात आढळून येत आहे आज फलटण शहरात विभागीय आयुक्त भेट न देताच गेल्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चा नागरिकांच्या आढळून येत आहे तसेच आयुक्तांचा हा प्रशासकीय दौऱ्याबाबत सोहळ्याच्या अनुषंगाने 1600 निगडित असणाऱ्या भाविक भक्तांना आयुक्तांकडे काही सूचना किंवा अडचणी मांडण्याच्या होत्या परंतु विभागीय आयुक्तांची भेट न झाल्यामुळे नागरिकांच्या मनात नाराजी दिसून येत आहे.
प्रशासनाव्यतिरिक्त या दौऱ्याची मात्र सर्वसामान्य कोणाही नागरिकांना कोणतीही माहिती नव्हती हा दौरा पूर्वनिर्मित असताना सुद्धा याबाबतची माहिती नसल्यामुळे माहिती प्रसारित न करण्याचे काय कारण असू शकते असाही संभ्रम करणारा प्रश्न आता नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे
#phaltannews
#palki
#samshersihnaiknibalkar
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
संबंधित बातम्या
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Thu 4th Jun 2026 08:48 pm
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Thu 4th Jun 2026 08:48 pm











